Shocking: चक्क उकळत्या तेलात हात घालून भजी काढतोय माणूस; पाहा धक्कादायक व्हिडिओ 

व्हायरल झालं जी
Updated May 04, 2022 | 17:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shocking Video | सोशल मीडियावर सतत काही ना काही धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी तर अशा असतात ज्यांना पाहून सर्वत्र एकच खळबळ माजते. सध्या असाच एक सर्वांना चकित करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

A man dipping his hands in hot oil, watch shocking the video 
चक्क उकळत्या तेलात हात घालून भजी काढतोय माणूस, पाहा व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सतत काही ना काही धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात.
  • सध्या एक धक्कादायक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
  • ज्यामध्ये एक व्यक्ती उकळत्या तेलातून भजी काढत आहे.

Shocking Video | मुंबई : सोशल मीडियावर (Social media) सतत काही ना काही धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी तर अशा असतात ज्यांना पाहून सर्वत्र एकच खळबळ माजते. सध्या असाच सर्वांना चकित करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कारण एक व्यक्ती चक्क उकळत्या तेलात हात घालून भजी बाहेर काढत आहे. हा व्हिडिओ पाहता क्षणी तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ज्या पद्धतीने ती व्यक्ती भजी काढत आहे, ते पाहून त्या दुकानदाराला कोणताही त्रास होत नसल्याचे दिसते आहे. (A man dipping his hands in hot oil, watch shocking the video).   

अधिक वाचा : गरमीच्या दिवसात जान्हवीने असा ब्लाउज घालून दिला थंडीचा अनुभव

सोशल मीडियावर तुम्ही रोज विविध प्रकारचे व्हिडिओ पाहत असाल. पण असे काही व्हिडिओ असतात जे पाहून आपल्याला धक्काच बसतो. सध्या हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांच्या बाबतीत असेच काहीसे घडले आहे. व्हिडिओमध्ये भजी उकळत्या तेलात तळलेले दिसत आहेत. भजी खाण्यासाठी लोकांची गर्दीही असते. मात्र, सर्वांच्या नजरा दुकानदाराच्या हातांकडे लागल्या आहेत. कारण तो ज्या पद्धतीने उकळत्या तेलातून भजी काढतोय, त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

अधिक वाचा : नोरा फतेही आणि टेरेंस लुईस एकमेकांच्या प्रेमात?

इथे पाहा व्हिडिओ

धक्कादायक व्हिडिओ

गरम तेलात दुकानदार ज्या प्रकारे आनंदाने हात घालतो ते पाहून तुम्ही क्षणभर स्तब्ध झाला असाल. आता हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर 'harish_goswami' नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर ९० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी अनेक धक्कादायक प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की हे कोणीही करू नये. मात्र कला ही कला असते कारण कलेसमोर कोणतीही भीती अपयशी ठरते असे काही युजर्संचे म्हणणे आहे. तर काही नेटकऱ्यांनी या दुकानदाराला अवॉर्ड देण्याचा हास्यास्पद सल्ला दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी