Propose Viral Video । मुंबई : कोणत्याही मुला-मुलीसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो जेव्हा ते त्यांचे प्रेम व्यक्त करतात. हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी ते काही ना काही नवीन युक्ती शोधत असतात. तर काही लोक नवीन कल्पना पाहून या क्षणाला अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. लक्षणीय बाब म्हणजे काही जण तर अचानक आपल्या प्रियकराला अथवा प्रियसीला प्रपोज करून सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर देखील अशाच एका भन्नाट प्रपोजची व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या प्रियसीला प्रपोज करत असतो पण तेवढ्यात अचानक एक कर्मचारी येतो अन् त्यांची अंगठी घेऊन स्टेजवरून खाली येतो. दरम्यान हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. (A man was proposing to his girlfriend in front of everyone but the employee spoiled the game).
अधिक वाचा : सोन्यातील तेजी कायम, चांदीचा भावदेखील वधारला, पाहा ताजा भाव
दरम्यान, आपल्या आयुष्यातील हा प्रेमाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी एक व्यक्ती डिस्नेलँडजवळ आपल्या प्रियसीला प्रपोज करत होता. पण मध्येच येऊन एका कर्मचाऱ्याने बिचाऱ्याची मनस्थिती बिघडवणारे काम केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन आपल्या प्रियसीला प्रपोज करताना दिसत आहे. सगळे खूप रोमँटिक वाटत होते. पण दोघांमध्ये अचानक डिस्नेलँडचा कर्मचारी येतो आणि अंगठी हिसकावून घेतो आणि जोडप्याला खाली येण्याचा आग्रह करतो. त्या व्यक्तीने कर्मचाऱ्याला विनंतीही केली, पण तो ऐकायला तयार नव्हता आणि जोडप्याला खाली येण्यास सांगतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की या जोडप्याचा मूड कसा बिघडला आणि त्यांचा सर्व प्लॅन फिसकटतो. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर '@BrotherHQ' नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र डिस्नेलँडच्या कर्मचाऱ्याने देखील जोडप्याची माफी मागितली आणि त्यांना खाली प्रपोज करण्याचे सूचवले. आता हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे आणि लोक त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.