'तो' केवळ मास्क घालून रस्त्यावर आला आणि मग...

Man wear face mask instead of underwear: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य सांगितले जात आहे. पण एका व्यक्तीने अंगावर केवळ आणि केवळ मास्कच परिधान करत रस्त्यावर आला.

man wear only mask on body instead of underwear and walks on oxford street  london
'तो' केवळ मास्क घालून रस्त्यावर आला   |  फोटो सौजन्य: Reuters

थोडं पण कामाचं

  • कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे
  • अंडरवेअर ऐवजी मास्क परिधान करुन रस्त्यावर तो रस्त्यावर आला
  • या तरुणाने असं का केलं? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये

संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. कोरनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वचजण चेहऱ्यावर मास्क (Face Mask) लावण्याचा सल्ला देतात. इतकेच नाही तर मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र, आता एक विचित्रच घटना समोर आली आहे. लंडन (London)मधील प्रसिद्ध ऑक्सफर्ड स्ट्रीट (Oxford Street) येथे एक तरुण रस्त्यावर केवळ आणि केवळ मास्कच परिधान करुन फिरताना दिसून आला. या तरुणाने मास्क हा चेहऱ्यावर लावण्याऐवजी अंडरवेअरच्या जागी परिधान केला होता. या तरुणाने आपल्या अंगावर एकही वस्त्र परिधान केलं नव्हतं. या घटनेमुळे सर्वांच्याच मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत की या तरुणाने असं का केलं असावं आणि चर्चेचा विषय बनला आहे.

अंगावर केवळ मास्क 

न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या ट्वीटरवर या तरुणाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सायमन डॉसन नावाच्या एका फोटो जर्नलिस्टने क्लिक केला होता. या फोटोमध्ये दिसत आहे की, या तरुणाच्या अंगावर कुठलेच कपडे नाहीयेत केवळ मास्क आहे आणि तो सुद्धा अंडरवेअरच्या जागेवर. हा तरुण केवळ मास्क परिसधान करुन रस्त्यावर फिरत होता.

स्वत:ची काळजी घेणे गरजेचे

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांना सोशल डिस्टंसिंग, चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. नागरिक सुद्धा या नियमांचे पालन करताना आपल्याला दिसत आहेत. कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झालेली नाहीये आणि त्यामुळे अशा परिस्थितीत नियमांचे पालन करणे आणि स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.

व्हायरल होतोय फोटो 

रॉयटर्सने ट्वीट केलेला तरुणाचा हा फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. तसेच केवळ मास्क परिधान करुन रस्त्यावर उतरलेल्या या तरुणाचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे.

लंडनमध्येही मास्क अनिवार्य 

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता ऑक्सफर्डसोबतच लंडनमधील अनेक भागांत मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. येथे नागरिकांना दुकानातून एखादे साहित्य खरेदी करायचे असेल तर मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. विनामास्क खरेदीसाठी येणाऱ्यांना सामान दिलं जात नाहीये. अशा परिस्थिती हा तरुण अंडरवेअर ऐवजी मास्क परिधान करुन रस्त्यावर फिरताना दिसून आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी