Man Beats Horse In Race । नवी दिल्ली : असे म्हणतात की चित्ताची चाल, गरूडाची नजर आणि घोड्यांच्या शर्यतीवर संशय घेऊ नये. कारण घोडा हा पृथ्वीरील सर्वात वेगवान धावणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. शर्यतीत माणूस घोड्याला हरवू शकतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र एका माणसाने तब्बल ५० घोड्यांना धावण्यामध्ये मागे टाकले आहे. एका ब्रिटिश धावपटूने हा पराक्रम केला आहे. या व्यक्तीने केवळ ५० घोडेच नाही तर १ हजार माणसांनाही हरवून ३५ किमीची शर्यत जिंकली आहे. (A man Won the 35 km race by beating 50 horses and 1000 men).
अधिक वाचा : भारताची भरभराट करणारा आंतरराष्ट्रीय मार्ग
ब्रिटनचा धावपटू रिकी लाइटफूटने (Ricky Lightfoot) शर्यतीच्या बाबतीत घोड्यांना मागे टाकून जगाला चकित केले आहे. या अशक्य कामगिरीमुळे ही व्यक्ती जगभरात चर्चेत आली आहे. ब्रिटनमध्ये मानव आणि घोडे यांच्यातील ही अनोखी ३५ किमीची शर्यत जिंकून या व्यक्तीने इतिहास रचला आहे. ही अनोखी शर्यत ब्रिटनमधील वेल्स शहरातील Llanwrtyd Wells येथे आयोजित करण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे या शर्यतीत तब्बल १५ वर्षांनंतर माणसाने घोड्यांचा पराभव केला आहे.
रिकी लाइटफूट ३७ वर्षांचे आहेत. ते डेरहॅम, कॅंब्रिया येथे राहतात. रिकी हे माजी अग्निशामक जवान आहेत. रिकी यांनी ३५ किलोमीटरची शर्यत अवघ्या २ तास २२ मिनिटे २३ सेकंदात पूर्ण केली. तर त्यांच्या विरोधात दुसरीकडे लेन हाऊस बॉय नावाचा घोडा होता. ज्याने ही शर्यत २ तास २४ मिनिटे २४ सेकंदात पूर्ण केली. याचा अर्थ रिकी यांनी घोड्याला एकूण २ मिनिटांनी पराभूत केले. तिसर्या क्रमांकावर किम अल्मन नावाचा घोडा देखील होता, ज्याने ही शर्यत इतर घोड्याच्या बरोबरीने पूर्ण केली.
लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी म्हणजेच १५ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये फ्लोरेन होल्टिंगर (Florien Holtinger) या व्यक्तीने ही अनोखी शर्यत जिंकली होती. तेव्हापासून ही शर्यत फक्त घोडेच जिंकत आहेत. ही अनोखी शर्यत ब्रिटनमध्ये १९८० पासून सुरू आहे. खरं तर १९८० मध्ये, न्यूड आर्म्स पबमध्ये, दोन लोकांनी एक पैज लावली की शर्यतीत माणूस घोड्यांना हरवू शकतो. यानंतर शर्यत सुरू झाली. शर्यत सुरू झाल्याच्या २४ वर्षांनंतर २००४ मध्ये ह्यू लॉब नावाच्या व्यक्तीने प्रथमच ती जिंकली होती. तेव्हा त्या व्यक्तीने अवघ्या २ तास ५ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली होती.