Viral: ऐकावं ते नवलच! ट्रेनच्या इंजिनमध्ये घुसून बसला प्रवासी; ड्रायव्हरला शिंकण्याचा आवाज आल्याने उडाली खळबळ

व्हायरल झालं जी
Updated Jun 10, 2022 | 14:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bihar Railway Stations । बिहारमधील सारनाथ बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिनखाली लपलेल्या तरुणाची गया स्टेशनवर सुटका झाली आहे. मात्र सुटका होण्यापूर्वी त्याने सुमारे १९० किलोमीटर प्रवास केला, परंतु चौकशीपूर्वीच तो पळून गेला.

A passenger got into the engine of the train Sarnath Buddha Purnima Express incident
ट्रेनच्या इंजिनमध्ये घुसून केला प्रवास, थोडक्यात बचावला जीव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्रेनच्या इंजिनमध्ये घुसून बसला प्रवासी.
  • ड्रायव्हरला शिकण्याचा आवाज आल्याने उडाली खळबळ.
  • प्रवाशाची ओळख पटायच्या अगोदर त्याने पळ काढला.

Sarnath Budh Purnima Express । नवी दिल्ली : बिहारमधील सारनाथ बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिनखाली लपलेल्या तरुणाची गया स्टेशनवर सुटका झाली आहे. मात्र सुटका होण्यापूर्वी त्याने सुमारे १९० किलोमीटरचा प्रवास रेल्वेच्या इंजिन डब्ब्यातून केला, परंतु चौकशीपूर्वीच त्याने पळ काढला. एका रेल्वे अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पहाटे चार वाजता गाडी गया रेल्वे स्थानकावर आली तेव्हा रेल्वे चालकाने या तरुणाला पाहिले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला दिलेल्या निवेदनात ड्रायव्हरने सांगितले की, त्याने खालून कुठूनतरी एका माणसाच्या शिंकण्याचा आवाज ऐकला तेव्हा तो लगेच टॉर्चच्या प्रकाशाने तिथे पाहण्यासाठी तिथे गेला असता ट्रॅक्शन मोटरच्या खालील जागेत एक माणूस झोपलेल्या अवस्थेत दिसला. (A passenger got into the engine of the train Sarnath Buddha Purnima Express incident). 

अधिक वाचा : END vs NZ मालिकेवर कोरोनाचे सावट, हा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

इंजिनमधील गरमीने बिघडली तब्येत

ट्रेनचा चालक म्हणाला की, "मी ताबडतोब त्याला वाचवण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. हा तरुण मानसिकदृष्ट्या खचलेला दिसत होता. इंजिनमधून निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे त्याची प्रकृती ढासळली होती. आरपीएफचे जवान त्याला बाहेर काढत असताना तो पाणी मागत होता. तरुणाची ओळख पटवण्यात रेल्वे अधिकारी अपयशी ठरले कारण तो बचावल्यानंतर लगेचच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. तो इंजिनमध्ये कुठून आला याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. राजगीरहून ट्रेन धावते आणि तो बहुधा रेल्वे यार्डातील इंजिनमध्ये लपून बसला असावा अशी प्राथमिक माहिती आहे. 

सारनाथ बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेस ट्रेनमधील घटना

राजगीर ते गया, सारनाथ बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेस ट्रेनचे सहा थांबे आहेत, दोन मिनिटांपासून ते १० मिनिटांपर्यंत. पाटना जंक्शन रेल्वे स्टेशनवर ट्रेनला जास्तीत जास्त १० मिनिटांचा थांबा आहे. कारण दोन मिनिटांत कोणीही बसू शकत नाही, असा अंदाज लोकांनी बांधला त्यामुळे तो पाटणा रेल्वे जंक्शन किंवा रेल्वे यार्डच्या इंजिनमध्ये बसला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र असे करणे अत्यंत धोकादायक आहे. ट्रेनच्या इंजिनच्या उष्णतेमुळे जीवही गमवावा लागतो. दरम्यान या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी