एक असा साधू जो ६० वर्षांपासून राहात आहे गुहेत, आता राममंदिरासाठी दिले १ कोटी रुपये

व्हायरल झालं जी
Updated Jan 30, 2021 | 11:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

अयोध्येत राममंदिर बांधण्याची तयारी चालू आहे. लोक यासाठी दान देत आहेत. पण आम्ही आपल्याला अशा एका दानशूराची कथा सांगणार आहोत जे गेल्या साठ वर्षांपासून एका गुहेत राहात आहेत.

Fakkad Baba
साठ वर्षांपासून गुहेत राहाणाऱ्या ८३ वर्षीय संन्याशाने राममंदिराला दिले एक कोटी 

थोडं पण कामाचं

  • साठ वर्षांपासून गुहेत राहाणाऱ्या ८३ वर्षीय संन्याशाने राममंदिराला दिले एक कोटी
  • बँकेत पोहोचलेल्या बाबांकडचा चेक पाहून बँकेचे कर्मचारीही झाले चकित
  • गेल्या साठ वर्षांपासून ऋषिकेश इथल्या एका गुहेत राहात आहेत स्वामी शंकर दास

ऋषिकेश: अयोध्येत (Ayodhya) राममंदिर (Ram Mandir) बांधण्याची तयारी सध्या जोरात चालू आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील लोक यासाठी दान (donation) देत आहेत. पण आम्ही आपल्याला अशा एका दानशूराची कथा सांगणार आहोत जे गेल्या साठ वर्षांपासून एका गुहेत (cave) राहात आहेत. आपल्या देणगीचा चेक (cheque) घेऊन जेव्हा ते बँकेत (bank) पोहोचले तेव्हा इतकी मोठी रक्कम पाहून बँकेचे कर्मचारीही (bank employees) हैराण झाले. उत्तराखंडच्या (Uttarakhand) ऋषिकेशमध्ये (Hrishikesh) नीलकंठ इथल्या एका गुहेत राहणाऱ्या ८३ वर्षीय संत स्वामी शंकर दास (Swami Shankar Das) यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हातात एक कोटी रुपयांचा चेक ठेवला.

फक्कड बाबा या नावाने आहेत प्रसिद्ध

संत शंकर दास गेल्या साठ वर्षांपासून गुहेत राहून आपले जीवन व्यतीत करत आहेत आणि त्यांना फक्कड बाबा या नावानेही ओळखले जाते. बाबांनी जेव्हा एक कोटी रुपयांचा चेक बँक कर्मचाऱ्यांना दिला तेव्हा ते चकित झाले. यानंतर त्यांनी चेकमध्ये लिहिलेली रक्कम पडताळून पाहिली तेव्हा त्यांच्या खात्यात तेवढी रक्कम असल्याचे आढळले. बाबांनी म्हटले आहे की आज त्यांच्या जीवनाचे लक्ष्य पूर्ण झाले आहे.

साठ वर्षांपासून राहात आहेत गुहेत

संत शंकर दास यांनी अतिशय सामान्य जीवन व्यतीत केले आहे. त्यांचे गुरू महर्षी योगी हे मस्तराम बाबांचे समकालीन मानले जातात. गेल्या चाळीस वर्षांपासून राम मंदिरासाठी पैसा एकत्र करणाऱ्या शंकर दासांनी सर्व भौतिक सुखांचा त्याग करून एका गुहेत साठ वर्षे काढली. मणिकूड पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध नीलकंठ मंदिराच्या या गुहेत अनेक वर्षांपासून भक्त येऊन दान आणि चढावा देत आहेत. बाबांनी याच रकमेतून जमा करत एवढी मोठी रक्कम एकत्र केली आहे.

तीन वर्षांत पूर्ण होईल काम

राममंदिराच्या निर्मितीसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधून लोक देणग्या देत आहेत ज्यात राजकीय नेत्यांपासूसन ते चित्रपटसृष्टी आणि इतरांचाही समावेश आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले आहे की अयोध्येत राममंदिरनिर्मितीचे काम ३६ ते ३९ महिन्यात पूर्ण होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी