Pink Diamond: हे जग आश्चर्यांनी भरलेले आहे, अनेक रहस्य या जगात दडलेले आहेत. इथे कधी, काय बघायला, ऐकायला मिळेल, काहीच सांगता येत नाही? काहीवेळा काही गोष्टींवर विश्वास ठेवणे देखील कठीण होते. असाच एक प्रकार ऑस्ट्रेलियातून (Australia) समोर आला आहे, जिथे दुर्मिळ शुद्ध गुलाबी हिऱ्याबाबत (pink diamond) धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हिरा 170 कॅरेटचा असून गेल्या 300 वर्षांत सापडलेला हिऱ्यांमध्ये हा सर्वात मोठा हिरा आहे. या शोधामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चला तर मग जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
ऑस्ट्रेलियन साइट ऑपरेटरने बुधवारी हिऱ्यांबाबत मोठी घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मध्य आफ्रिकेतील अंगोला येथील खाण कामगारांनी एक दुर्मिळ शुद्ध गुलाबी हिरा शोधून काढला आहे. गेल्या 300 वर्षात सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे. लुकापा डायमंड कंपनीने गुंतवणूकदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'द लुलो रोज' नावाचा 170 कॅरेटचा गुलाबी हिरा, देशाच्या हिऱ्यांनी समृद्ध ईशान्येकडील लुलो खाणीत सापडला आहे. तो आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या गुलाबी हिऱ्यांपैकी एक आहे.
Read Also : आज गटारी अमावस्या,असं का पडलं नाव जाणून घ्या
या शोधामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या हिऱ्याचे वर्णन ऐतिहासिक शोध म्हणून केले जात आहे. खाणीत सहभागी असलेल्या अंगोलन सरकारनेही याचे स्वागत केले आहे. अंगोलाचे खनिज संसाधन मंत्री डायमँटिनो अझेवेडो म्हणाले की, लुलोकडून जप्त केलेला हा विक्रम आणि भव्य गुलाबी हिरा अंगोलाचा जागतिक स्तरावरील महत्त्वाचा खेळाडू असल्याचे दाखवत आहे. हा हिरा आंतरराष्ट्रीय टेंडरमध्ये कदाचित मोठ्या किमतीत विकला जाईल.
Read Also : स्मिता ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने अनेकांना धक्का
दरम्यान हा हिरा देखील थोडासा कापून पॉलिश केला जाईल, ज्यामुळे त्याची मागणी आणखी वाढेल. तथापि, त्याचे वजन 50 टक्के कमी केले जाऊ शकते. याआधीही गुलाबी हिरे रेकॉर्डब्रेक किमतीत विकले गेले आहेत. 59.6 कॅरेट पिंक स्टार 2017 मध्ये हाँगकाँगच्या लिलावात US$71.2 दशलक्षमध्ये विकला गेला. आतापर्यंत विकला गेलेला हा सर्वात महागडा हिरा आहे.