Viral: चर्चा तर होणारच! इयत्ता दुसरीतील मुलाने अवघ्या १८ मिनिटात पोहून पार केली यमुना नदी 

व्हायरल झालं जी
Updated Jun 24, 2022 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News | सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एका लहानग्याचे खूप कौतुक होत आहे. कारण या ८ वर्षांच्या चिमुकल्याने केवळ १८ मिनिटांत यमुना नदी पार करून सर्वांनाच चकित केले आहे.

A second class student swam across the river Yamuna in just 18 minutes
इयत्ता दुसरीतील मुलाने १८ मिनिटात पोहून पार केली यमुना नदी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इयत्ता दुसरीतील मुलाने १८ मिनिटात पोहून पार केली यमुना नदी.
  • शिवांश असे मुलाचे नाव आहे.
  • या आधी आराध्या श्रीवास्तव नावाच्या मुलीने २२ मिनिटांत नदी पार केली होती.

Viral News | प्रयागराज : सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एका लहानग्याचे खूप कौतुक होत आहे. कारण या ८ वर्षांच्या चिमुकल्याने केवळ १८ मिनिटांत यमुना नदी पार करून सर्वांनाच चकित केले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाने आपल्या एका असामान्य कारनाम्याने जगाला चकित केले आहे. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या शिवांश मोहिले या विद्यार्थ्याने अवघ्या १८ मिनिटांत प्रयागराज येथील यमुना नदी पार करून विक्रम केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आराध्या श्रीवास्तव नावाच्या मुलीने २२ मिनिटांत यमुना नदी पार केली होती. सध्या या चिमुकल्याच्या या विक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (A second class student swam across the river Yamuna in just 18 minutes). 

अधिक वाचा : अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

२२ मिनिटांचा होता रेकॉर्ड

शिवांशने हा अनोखा विक्रम करून आपल्या प्रशिक्षकांनाही आश्चर्यचकित केले आहे. शिवांशने त्याच्या वयोगटातील इतर मुलांच्या तुलनेत फारच कमी वेळात यमुना नदी पार केली. शिवांशच्या या पराक्रमानंतर त्याच्या प्रशिक्षकांनी त्याच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे खूप कौतुक केले. लक्षणीय बाब म्हणजे शिवांश हा शहरातीलच टागोर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. शिवांश मीरापूर सिंधू सागर घाटावरून पोहत यमुना नदीच्या पलीकडे पोहोचला.

केवळ १८ मिनिटांत पार केली यमुना नदी 

शिवांशच्या कारनाम्यावर त्याचे प्रशिक्षक त्रिभुवन निषाद यांनी सांगितले की, ८ वर्षांच्या मुलाने अवघ्या १८ मिनिटांत यमुना नदी पार करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या या कारनाम्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ते म्हणाले की, यावर्षी शिवांश हा २ ते ८ वयोगटातील पहिला जलतरणपटू ठरला आहे ज्याने पराक्रम करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. यासोबतच शिवांशने आपल्या आई-वडिलांचे नाव रोशन केले आहे. त्रिभुवन निषाद म्हणाले की, नवजीवन जलतरण क्लबमध्ये सध्या सर्व वयोगटातील १०० मुले प्रशिक्षण घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी