धक्कादायक! महिलांनो, ट्रेनमधून प्रवास करताय सावधान रहा...

देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. रेल्वे परिसरामध्ये आणि फिरत्या ट्रेनमध्येही बलात्काराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे.  भारतीय रेल्वेबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Representative Image
धक्कादायक! महिलांनो, ट्रेनमधून प्रवास करताय सावधान रहा... 

मुंबईः देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. रेल्वे परिसरामध्ये आणि फिरत्या ट्रेनमध्येही बलात्काराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे.  भारतीय रेल्वेबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये हे उघड झाले आहे की, 2017 ते 2019 दरम्यान रेल्वे परिसर आणि फिरत्या गाड्यांमध्ये बलात्काराच्या 160 पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. 

एका आरटीआय (RTI) ला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे की, गेल्या 3 वर्षांत भारतीय रेल्वेच्या परिसरात आणि चालत्या ट्रेनमध्ये बलात्काराच्या 160 पेक्षा जास्त घटना घडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान 2017 च्या तुलनेत 2019 मध्ये बलात्काराच्या घटना कमी झाल्या आहेत. 

2019 मध्ये घटनांमध्ये घट 

2017 मध्ये जेथे बलात्काराशी संबंधित 51 घटना घडल्या आहेत, त्या 2019 मध्ये घटून 44 झाल्यात. दरम्यान 2018 मध्ये ही संख्या वाढून 70 वर पोहोचली होती.

यासंदर्भात नीमचचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती. त्यांच्या प्रश्नाला मिळालेल्या उत्तरानुसार, 2017 पासून 2019 यादरम्यान रेल्वे परिसरात बलात्काराच्या 136 घटना आणि चालत्या ट्रेनमध्ये 29 घटना म्हणजेच एकूण 165 घटना घडल्या होत्या. 

2017 मध्ये बलात्काराच्या 51 घटना 

गेल्या वर्षी 2019 मध्ये 44 प्रकरणं समोर आलेत. ज्यात 36 बलात्कार रेल्वेच्या परिसरात तर 8 बलात्काराच्या घटना चालत्या ट्रेनमध्ये घडल्या आहेत. 2018मध्ये बलात्काराच्या प्रकरणात खूप वाढ झाली. यावर्षी बलात्काराच्या प्रकरणात 70 प्रकरणांपैकी 59 प्रकरणात रेल्वे परिसरात दरम्या 11 ट्रेनमध्ये झाले. 2017 मध्ये बलात्काराच्या 51 प्रकरणांपैकी 41 रेल्वे परिसरात तर 10 चालत्या ट्रेनमध्ये घडल्याचं समोर आलं. 

महिलांवरील बलात्कार व्यतिरिक्त एकूण 1672 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 802रेल्वे स्टेशनच्या परिसरात तर तर 870 चालत्या ट्रेनमध्ये झालेत. गेल्या 3 वर्षांत अपहरणाच्या 771 घटना घडल्यात. याव्यतिरिक्त दरोड्याच्या 4718 प्रकरणं, हत्येचा प्रयत्नाच्या 213 आणि 542 हत्येची प्रकरणं रेल्वे परिसरात आणि चालत्या ट्रेनमध्ये घडल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी