VIDEO: एकट्या मुलीने ६ मुलांना शिकवला धडा; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Jun 15, 2022 | 11:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Girl Fighting Video । जगभरातील लाखो स्त्रिया लैंगिक छळाच्या बळी पडतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांना अनेकदा स्वसंरक्षणाचे धडे घेण्यास सांगितले जाते.

A single girl taught 6 boys a good lesson, Shocking video goes viral
एकट्या मुलीने ६ मुलांना शिकवला धडा, पाहा व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकट्या मुलीने ६ मुलांना शिकवला धडा
  • जगभरातील लाखो स्त्रिया लैंगिक छळाच्या बळी पडतात हे अत्यंत दुर्दैवी आहे
  • मुलीच्या धाडसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे

Girl Fighting Video । मुंबई : जगभरातील लाखो स्त्रिया लैंगिक छळाला बळी पडतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांना अनेकदा स्वसंरक्षणाचे धडे घेण्यास सांगितले जाते. तसेच आजकाल मुली खूप हुशार झाल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या मार्गाने अडचणीतून कसे बाहेर पडायचे हे चांगलेच माहिती आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले एका मुलीला चारही बाजूंनी घेरतात आणि तिचा छळ करू लागतात. मात्र यावेळी विजय मुलीचा झाला असून मुलीने त्या मुलांना धडा शिकवला आहे. (A single girl taught 6 boys a good lesson, Shocking video goes viral). 

अधिक वाचा : SSC: ५ दिवसात कमी होणार दहावीच्या विद्यार्थ्यांची धकधक

सुनसान रस्त्यावर मुलांनी घेरले

दरम्यान, मुलीच्या धाडसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमकावणार्‍या ६ मुलांना मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ६ मुले एका सुनसान रस्त्यावर मुलीला घेरून त्रास देताना दिसत आहेत. व्हिडीओचे ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही. मुलगी मग त्या मुलांशी भांडते आणि मार्शल आर्ट्सच्या हालचालींसह फ्लाइंग किकसह त्यांची पळताभुई थोडी करते. तिने त्या सर्व ६ मुलांना एक एक करून लाथांनी मारले. लक्षणीय बाब म्हणजे २५ सेकंदांचा हा व्हिडीओ 'द फिगेन' अकाउंटने ट्विटरवर या कॅप्शनसह पोस्ट केला आहे.

व्हिडीओ पाहून लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मुलीशी गोंधळ घालू नका, व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ३५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि ९,००० हून अधिक लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे.  हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा अंदाज या व्हिडीओवरून लावता येतो. दरम्यान नेटकरी मुलीचे शौर्य आणि तिच्या सामर्थ्याने भारावून गेले आहेत. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे की महिलांना दररोज इतका त्रास सहन करावा लागतो. एका यूजरने लिहिले की, "कोणत्याही मुलीच्या वाट्याला असा संघर्ष कधीच येऊ नये. तुमच्या मुलांना शिकवा की हे चुकीचे कृत्य आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी