Viral News | मुंबई : सोशल मीडियावर कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सध्या अशी एक घटना समोर आली आहे ज्याला पाहून काही लोकांना धक्का बसतोय तर काही लोकांना हसू आवरत नाही. कारण कोटा रेल्वे स्थानकाच्या पॅनेल रूममध्ये एक कोब्रा एका बॉसप्रमाणे रेल्वे अधिकाऱ्याच्या टेबलावर ठाण मांडून बसला आहे. तब्बल ६ फुटांच्या या कोब्राने सगळ्यांनाच गोंधळात टाकले आहे. कोटा विभागातील रावठा रोड स्टेशनवरील टेबलावर ६ फूट लांब कोब्रा बसलेला दिसला. (A six-foot-tall cobra sits on a railway official's table, the photo goes viral).
दरम्यान, एका पत्रकाराने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक कोब्रा एखाद्या बॉसप्रमाणे पॅनेल रूममधील टेबलवर बसलेले पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या विषारी कोब्रामुळे तेथील व्यस्त रेल्वे विभागावर त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. मात्र सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
अधिक वाचा : घरातील आरसा चुकीच्या दिशेला लावल्यास येईल आर्थिक संकट
"कोटा विभागातील रावठा रोड (RDT) च्या पॅनेल रूममध्ये सहा फुटांचा कोब्रा रेल्वे अधिकार्यांच्या टेबलावर बसला. मात्र त्यामुळे व्यस्त विभागातील रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. स्टेशनवर दररोज हजारो इंजिनियरिंग/वैद्यकीय उमेदवारांची गर्दी असते, असे पत्रकार दिपक कुमार यांनी हा फोटो शेअर करत म्हटले.
सोशल मीडियावरील युजर्स मात्र या घटनेचा आनंद घेत आहेत. बरेच युजर्स या घटनेमुळे चक्रावून गेले आहेत तर काही जण यामुळे घाबरून गेले आहेत. बऱ्याच लोकांनी याच्यामुळे रेल्वेसेवेवर याचा परिणाम कसा झाला नाही अशी विचारणी केली आहे. तर काहींनी सापाच्या मागे असलेल्या माणसावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या घटना काही नवीन नाहीत. कारण गेल्या वर्षी देखील एका माकडाने नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये प्रवेश केला आणि ज्यूस पिण्याचा ग्लास हिसकावून घेतला होता. व्हीआयपी लाउंजमधील बार काउंटरवर प्राइमेट रिअल फ्रूट ज्यूस पितानाचा माकडाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.