Viral: 'कच्चा बादाम' नंतर 'बाकी नींबू बाद विच पाऊंगा'ने वेधले लक्ष; पाहा लिंबू सोडा विकण्याचा भन्नाट अंदाज 

व्हायरल झालं जी
Updated Apr 18, 2022 | 11:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video | सोशल मीडियाच्या जगात काहीही होऊ शकते. कोणत्याही क्षणी कोणाला प्रसिद्धी मिळेल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञान व्यक्ती देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचते.

 a video of a person selling lemon soda is going viral on social media
'कच्चा बादाम' नंतर 'बाकी नींबू बाद विच पाऊंगा'ने वेधले लक्ष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर लिंबू सोडा विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओत संबंधित व्यक्ती गाण्याच्या माध्यमातून सोडा विकत आहे.
  • या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

Viral Video | मुंबई : सोशल मीडियाच्या जगात काहीही होऊ शकते. कोणत्याही क्षणी कोणाला प्रसिद्धी मिळेल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञान व्यक्ती देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचते. असेच काहीसे रानू मंडलसोबत घडले, जिच्या आवाजाने खूप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर 'कच्चा बदाम' फेम भुवन बड्याकरसोबत झाला. आता लिंबाच्या किमती गगनाला भिडत असताना लिंबू सोडा विकणाऱ्या एका व्यक्तीचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. लिंबू सोडा विकण्याची त्यांची शैली अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी आहे. (a video of a person selling lemon soda is going viral on social media). 

अधिक वाचा : Mumbai : कळस यात्रेदरम्यान दोन गटात राडा

इथे पाहा व्हिडिओ 

या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती लिंबू सोड्याच्या दुकानात आहे आणि गाणे गाऊन सांगत आहे आणि बनवत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. ज्या इंन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, त्या पेजवर तो सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे या लिंबू सोडा विक्रेत्यालाही चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. तीन वर्षांपूर्वीही या व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्येही तो आपल्या स्टायलिश स्टाईलमध्ये लिंबू सोडा विकत होता. ही व्यक्ती पंजाबमधील रूप नगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओला युजर्सच्या अनेक कमेंट 

लिंबू सोडा विकणाऱ्या या व्यक्तीच्या व्हिडिओवर सोशल मीडियावरील युजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. एका व्यक्तीने याला लोकप्रियता मिळवण्याचे निमित्त म्हटले आहे, पण काही लोक म्हणत आहेत की तो आधीच प्रसिद्ध आहे, त्याला तसे करण्याची गरज नाही. पण लिंबू सोडा विकण्याची या माणसाची शैली काहीही असली तरी लिंबाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तो नक्कीच दिलासा देणारा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी