Bhusaval Railway station Viral VIDEO । भुसावळ : महाराष्ट्राच्या भुसावळ रेल्वे स्टेशनवर एका कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ होता-होता टळला. झाले असे, की भुसावळ रेल्वे स्टेशनवर चालत्या रेल्वेतून उतरताना एक महिला खाली पडली होती. ड्यूटीवर असलेल्या टिकट चेकिंग कर्मचाऱ्याने तत्परता दाखवत महिलेला वाचवले. (A woman fell from a moving train and was rescued by a railway employee)
अधिक वाचा : हे पदार्थ युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी असतात विषासमान
रेल्वे मंत्रालयाने या घटनेचा व्हीडियो स्वदेशी सोशल मीडिया मंच 'कू' (Koo App) वर शेयर करत लिहिले, "रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वाचला महिला प्रवाशाचा जीव! महाराष्ट्राच्या भुसावळ स्टेशनवर गतिमान असणाऱ्या ट्रेनमधून उतरताना एकाएकी खाली पडलेल्या महिलेला ड्यूटीवर असलेल्या तिकिट चेकिंग कर्मचाऱ्याने वाचवले. कृपया चालत्या ट्रेनमधून चढणे-उतरणे करू नका. हे जीवघेणे असू शकते."
मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाने मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना, अर्थात, मुंबई प्रभागाचे के 2, भुसावळ प्रभागाचे 3, नागपुर प्रभागाचे 2, पुणे प्रभागाचे 2 आणि सोलापुर प्रभागाच्या एका कर्मचाऱ्याला ‘महाप्रबंधक सुरक्षा पुरस्कार’ही दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथे आयोजित एका समारंभात जून 2022 हे पुरस्कार दिले गेले. सावधानी, संकटांना रोखण्यातले त्यांचे योगदान आणि ट्रेन चालवतानाची सुरक्षा यासाठी हे पुरस्कार दिले गेले. पुरस्कारात एक पदक, प्रशस्तीप्रमाण पत्र, सुरक्षा कार्याचे एक प्रशस्तीपत्र आणि 2000 रुपये रोख यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : अॅसिडिटीच्या समस्येवर फायदेशीर ठरतात हे घरगुती उपाय