Shocking News । मुंबई : सध्या कलियुग सुरू आहे, या कलियुगात कधी काय घडेल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. याशिवाय घडलेल्या घटनेवर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. असेच एक प्रकरण तामिळनाडूतून समोर आले आहे, ज्या प्रकरणाच्या सत्यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. कारण एक महिला गेली ३६ वर्षे अशा स्थितीत जगत होती, ज्याची लोकांना माहिती मिळताच लोक देखील थक्क झाली आहेत. कारण पतीच्या निधनानंतर ही महिला 'पुरूष' म्हणून जगत होती. (A woman has been living as a man for 36 years after her husband's death).
अधिक वाचा : अदानी ग्रुपने या मीडिया कंपनीचा विकत घेतला 49% हिस्सा...
तामिळनाडू येथील रहिवासी एस पेटचियाम्मल यांची ही धक्कादायक कहाणी आहे. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांनी पेटचियाम्मल यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. त्यावेळी तिला मदत करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातीला ही महिला मजूर म्हणून चहाच्या दुकानात काम करत होती.
पेटचिय्याम्मल या महिलेची तिथे शोषण होऊ लागले. यानंतर तिने 'पुरूष' होण्याचा निर्णय घेतला. एका मंदिरात जाऊन त्यांनी केस कापले आणि नंतर मुलांचे कपडे घालायला सुरुवात केली. २० वर्षांपासून ती तिच्या गावात राहते, पण तिची मुलगी आणि जवळच्या नातेवाईकांशिवाय कुणालाही याची माहिती मिळाली नाही. कारण ती पेटाचियाम्मलपासून मुथू झाली होती.
दरम्यान, या महिलेन मुथू बनून ती सर्व कामे केली जी पुरूष करतात. बँक खाते, आधार कार्डापासून ते मतदार ओळखपत्रापर्यंत तिने आपले नाव बदलले आणि लोक तिला पुरूष समजून मुथूच्या नावाने ओळखू लागले. तिने अनेक ठिकाणी काम केले. चित्रकार म्हणून काम केले, पराठा मस्त म्हणूनही काम केले. आता तिच्या मुलीचेही लग्न झाले आहे. पण ती स्वतःला बदलायला बिल्कुल तयार नाही. तिला मरेपर्यंत तिची मर्दानी ओळख जपायची आहे. मात्र आता लोकांना आपण पुरुष आहोत, असे वाटू लागले आहे. पण या सत्य घटनेने लोकांना धक्काच बसला आहे. याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.