VIRAL VIDEO: टॉवेल गुंडाळून थेट शिरला मेट्रोत आणि केलं असं काही की....

Man enter in metro wearing towel: एक व्यक्ती थेट टॉवेल गुंडाळून मेट्रोत शिरला. मेट्रोत टॉवेल गुंडाळून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

a young man enter in metro wearing towel video goes viral watch it
VIRAL VIDEO: टॉवेल गुंडाळून थेट शिरला मेट्रोत आणि केलं असं काही की....  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • टॉवेल गुंडाळून मेट्रोत शिरला तरुण
  • तरुणाला पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का
  • सोशल मीडियात व्हायरल होतोय व्हिडिओ

Viral Video: सोशल मीडियात दररोज काही ना काही फोटोज किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा यापैकी फोटो किंवा व्हिडिओ इतके मजेदार असतात जे पाहून हसू आवरत नाहीत. तर काही व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्या एका तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण चक्क टॉवेल गुंडाळून मेट्रोत शिरतो. टॉवेल गुंडाळून मेट्रोत आलेल्या तरुणाला पाहून प्रवाशांना हसू आवरत नाहीये. (a young man enters in metro wearing a towel video goes viral watch it)

मेट्रोत टॉवेल गुंडाळून शिरलेल्या तरुणाचा व्हिडिओ मेट्रोतील एका प्रवाशाने शूट केला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत पहायला मिळते की, मेट्रोत अनेक प्रवाशी प्रवास करत आहेत. त्याच दरम्यान एक तरुण टॉवेल गुंडाळून मेट्रोत प्रवेश करतो. या तरुणाला टॉवेलवर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.

मेट्रोतील सर्व प्रवाशी या तरुणाकडे पाहू लागतात. टॉवेल गुंडाळून मेट्रोत शिरलेला हा तरुण एकडे-तिकडे फिरु लागतो. इतकेच नाही तर मेट्रोतील काचेत पाहून आपले केस विंसरू लागतो. ज्या पद्धतीने हा तरुण मेट्रोत वागत होता ते पाहून मेट्रोतील इतर प्रवाशांना हसू आवरत नव्हते. या तरुणाला टॉवेलवर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

हे पण वाचा : बहुतेक स्वयंपाकघरात केली जाते ही चूक

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसायला येईल. तुम्हीही विचार करत असाल हा माणूस आहे तरी कोण? या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ 'mohitgauhar' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिला आहे. तर एक लाखांहून अधिक युजर्सने या व्हिडिओला लाईक केलं आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट्स सुद्धा करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी