बदायू : उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) एका युवकाला उंदराचा हत्या (murder)केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. काय हसू आलं का?, तुम्ही वाचलात ते खरंच आहे. युपीमधील बदायू (Badayu) येथे ही घटना घडली आहे. मुद्दामहून तरुणाने उंदारचा जीव घेतल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन (Postmortem) करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. (A young man was arrested for killing rat)
अधिक वाचा :
बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत उंदराचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोस्टमार्टमसाठी पोलिसांनी एसी टॅक्सीचे 1500 रुपये भाडेही दिले. तसेच शवविच्छेदनासाठी आवश्यक 225 रुपयांची पावती ही फाडल्याचे दैनिक भास्करने वृत्त दिले आहे. दरम्यान विकेंद्र शर्मा या सामाजिक कार्यकर्त्याने आरोपी मनोज कुमारविरोधात तक्रार दिली होती. आरोपीला त्यांनी उंदराला सोडण्याची विनंती केली होती. पण आरोपीने त्यांना प्रतिसाद न देता त्याचा जीव घेतला. त्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रकरणात प्राणी क्रुरता अधिनियमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे पोर्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारे पोलिसांना आरोपीविरोधात पुरावा गोळा करता येणार आहे.
अधिक वाचा :
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज कुमार हा उंदराच्या जीवाशी खेळत होता. उंदराला दोरी बांधली आणि ते दोरी एका फरशीच्या तुकड्याला बांधली. एका नाल्यातील पाण्यात डुबवत होता. हे तो वारंवार करत होता, हे शर्मा यांनी पाहिलं त्यांनी त्याला हटकलं परंतु आरोपी कुमार हा प्रकार करत राहिला.
उंदरासोबत खेळून मन पूर्ण झाल्यानंतर आरोपीने एका फरशीच्या तुकड्याला बांधलेल्या उंदराला नाल्यात फेकून दिले. त्यामुळे हा उंदीर मृत झाला. उंदराच्या मृत्यूला हा आरोपीच दोषी असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.