Shocking News In Marathi | नवी दिल्ली : असे बोलले जाते की प्रेमात जात, धर्म, रंग यांना थारा नसतो ते अगदी खरं आहे. कारण प्रेमात फक्त पाहिले जाते ते प्रेम. या प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेक जण आपला जीवही देतात. पण सध्या प्रेमाबाबत असे प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण प्रेमाखातर एक तरूणी बांगलादेशातून पोहत भारतात आली होती. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे. चला तर मग जाणून घ्या नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (A young woman from Bangladesh came to India by swimming to marry BF).
दरम्यान, सध्या सोशल मीडियाचे जग या सोशल मीडियाच्या जगात कधी काय घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये ऑनलाइन प्रेमाने एका तरूणीला अवैधरित्या देशाची सीमा ओलांडण्यास भाग पाडले आहे. दरम्यान या तरूणीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : केकेच्या चेहर्यावर आणि डोक्यावर जखमा, वाचा सविस्तर
माहितीनुसार, २२ वर्षीय कृष्णा मंडल असे या तरुणीचे नाव आहे. तिला पोलिसांनी अवैधरित्या देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली आहे. कृष्णा या तरूणीची फेसबुकवर अभिक मंडल या तरूणासोबत मैत्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांचे बोलणे सुरू झाले आणि त्यांची मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण कृष्णा हिला अभिक पासून वेगळे राहणे सहन झाले नाही आणि ति त्याला भेटण्यासाठी भारतात पोहोचली. भारतात पोहोचण्यासाठी तिने काय केले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुंदरबनची जंगले पार करून आणि नदीतून पोहत कृष्णा हिने भारतात प्रवेश केला. कारण तिच्याकडे वैध पासपोर्ट नव्हता.
यानंतर दोघांनी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात लग्न केले. मात्र पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कृष्णा या तरूणीला अटक केली आहे. कृष्णा हिला आता बांगलादेश उच्चायुक्तांकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे प्रकरण चर्चेचा विषय बनले असून सत्य जाणून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र अवैधरित्या कोणी देशाची सीमा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.