चीनमध्ये पदवी घेतलेला विद्यार्थी विकतो कलिंगड ज्यूस

चिनी पदवीला कोणीही विचारत नसल्यामुळे तरुणावर वर्दळीच्या ठिकाणी कलिंगड ज्यूस विकण्याची वेळ आली

Aeronautical engineer who studied in China ends up selling juice in Pakistan
चीनमध्ये पदवी घेतलेला विद्यार्थी विकतो कलिंगड ज्यूस 
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये पदवी घेतलेला विद्यार्थी विकतो कलिंगड ज्यूस
  • चिनी पदवीला कोणीही विचारत नसल्यामुळे झाली बिकट अवस्था
  • उदरनिर्वाहासाठी कलिंगड ज्यूस विकतोे

कराची: परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेून उत्तम करिअर करण्याचे स्वप्न अनेकजण बघतात. याच पद्धतीने पाकिस्तानमधील एका तरुणाने मोठे स्वप्न बघितले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये जाऊन त्याने पदवी घेतली. पण आज त्याची पदवी मातीमोल झाली आहे. चिनी पदवीला कोणीही विचारत नसल्यामुळे पाकिस्तानमधील तरुणावर वर्दळीच्या ठिकाणी कलिंगड ज्यूस विकण्याची वेळ आली आहे. Aeronautical engineer who studied in China ends up selling juice in Pakistan

कराची हे पाकिस्तानच्या आर्थिक राजधानीचे शहर. पण कराचीत राहूनही रोजगाराची चांगली उपलब्ध होत नाही. चीनमधील विद्यापीठाच्या पदवीला रद्दी कागदाएवढेच महत्त्व उरले आहे. यामुळे पाकिस्तानच्या कराचीत राहणारा तरुण वर्दळीच्या ठिकाणी कलिंगड ज्यूस विकत आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या अब्दुल मलिक याने यूएईमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या शाखेत पदवी घेण्यासाठी अब्दुलने चीनच्या विद्यापीठात प्रवेश केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल पाकिस्तानमध्ये परतला. त्याला पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स कामरा येथे इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. नंतर पेशावर येथील फ्लाईंग क्लबमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून काम मिळाले. काही वर्षे एका खासगी कंपनीत सहाय्यक रॅम्प अधिकारी म्हणून काम केले. पण योग्यता आणि अनुभव असूनही अब्दुलला योग्य पद, प्रतिष्ठा आणि पगार मिळाला नाही. 

पाकिस्तानमधील सर्व विमानतळांवर अर्ज केला. प्रत्येक विमान कंपनीला नोकरीसाठी अर्ज पाठवला. पण कोणत्याही आस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही; असे अब्दुलने जिओ न्यूज या पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

उर्दू, इंग्रजी, चिनी, पश्तो आणि अरबी या पाच भाषा अस्खलीत बोलता आणि लिहिता येतात. चीनच्या विद्यापीठातून घेतलेली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या शाखेतील पदवी आहे. पण नोकरी मिळत नाही. यामुळे निराश झालेल्या अब्दुलने उदरनिर्वाहासाठी कराचीतील वर्दळीच्या ठिकाणी कलिंगड ज्यूस विकण्याचा निर्णय घेतला. 

सहा महिने बेरोजगार होतो. घरातच होतो. नोकरीसाठी प्रयत्न करुन थकलो. पण चीनच्या विद्यापीठातील पदवीला कोणी विचारतच नाही. अखेर कलिंगड ज्यूस विकण्याचा निर्णय घेतला. याच व्यवसायात उदरनिर्वाहापुरते पैसे मिळवत आहे; असे अब्दुल म्हणाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी