Viral Video : मुलगी आणि मुलाच्या प्रेमाला लाजवणारी लव्हस्टोरी ! 8 वर्ष टिकले नाते, अन् असं झालं लग्न

व्हायरल झालं जी
Updated Dec 20, 2021 | 16:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gay couple Marriage: तेलंगणातील सुप्रियो आणि अभय यांचे 8 वर्षे टिकलेले नाते आता लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहे. दोघांनी थाटामाटात लग्न केले. त्यांची मैत्रिण सोफिया डेव्हिडने हा समारंभ आयोजित केला होता, समलैंगिक जोडप्याची मैत्रीण, जी स्वतः LGBTQ समुदायातील आहे.

After 8 years affair, First marriage of gay men
अजब-गजब प्रेमकहाणी, समलैगिक पुरुषांचा पहिला विवाह   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तेलंगणातील समलैंगिक पुरुषांचा पहिला विवाह
  • रिसॉर्टमध्ये अभय आणि सुप्रियोचे लग्न झाले
  • समलैंगिक जोडप्याची मैत्रीण सोफिया डेव्हिडने हे लग्न लावले

Gay couple Marriage: हैदराबादमधील एका समलिंगी जोडप्याने त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसह एका समारंभात अंगठ्याची देवाणघेवाण केली आणि अधिकृत विवाह केला.एका रिसॉर्टमध्ये शनिवारी हा खासगी सोहळा पार पडला. या समारंभात बंगाली आणि पंजाबी विवाह विधी पार झाले. कारण सुप्रियो, एका अग्रगण्य हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ प्राध्यापक सदस्य असून तो कोलकाता येथील आहे. तर अभय, एका मल्टीनॅशनल कंपनीत असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. 

तेलंगणातील समलैंगिक पुरुषांचा पहिला विवाह

In a first in Telangana: Photos of gay couple's 'promising ceremony' | The Times  of India

तेलंगणातील समलैंगिक पुरुषांच्या पहिल्या लग्नात, सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या नात्याला पुढे नेत ते दोघंही लग्नबंधनात अडकले. सुप्रियो म्हणाले की, त्यांच्या लग्नाने सर्वांना एक संदेश दिला आहे की आनंदी राहण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही.  हे तेलंगणातील पहिले समलैंगिक जोडपे असल्याचे मानले जाते. दोघांची प्रेमकहाणी 8 वर्षे चालली आणि त्यानंतर दोघांनी शाही पद्धतीने लग्न केले.


रिसॉर्टमध्ये अभय आणि सुप्रियोचे लग्न झाले

In a first in Telangana: Photos of gay couple's wedding ceremony | The Times  of India

लग्नाची नोंदणी होऊ शकली नसली तरी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी समारंभासाठी उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितले.  31 वर्षीय सुप्रियो आणि 34 वर्षीय अभय यांनी एकमेकांना अंगठी घातली. रिसॉर्टमध्ये या दोघांचं लग्न झाले. हा विवाहसोहळा सोफिया डेव्हिडने आयोजित केला होता, समलैंगिक जोडप्याची ही मैत्रीण, जी स्वतः LGBTQ समुदायातील आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी