Viral Twitter Post : ट्विटरमधूल काढलेल्या या कर्मचाऱ्याने लिहिली अशी भन्नाट पोस्ट, सोशल मीडियावर होतेय कौतुक

Twitter Lay Off : नुकतेच ट्विटरने भारतातील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्या कमी करण्याच्या निर्णयानुसार ट्विटरने भारतातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास (Twitter lay offs) सुरूवात केली आहे. आता याचसंदर्भात आणखी एक घटना घडत ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होते आहे.

Viral Post
व्हायरल पोस्ट 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरमधून कर्मचाऱ्यांना काढण्याचा धडाका सुरूच
  • ट्विटरमधील एका भारतीय कर्मचाऱ्याने नोकरी गेल्यावर लिहिली भन्नाट पोस्ट
  • ही पोस्ट सोशल मीडियावर झाली व्हायरल

Yash Agarwal Fired From Twitter : नवी दिल्ली : ट्विटर (Twitter)आणि ट्विटरमधील कर्मचारी यांची दुनियाच बदलून गेली आहे. इलॉन मस्कने (Elon Musk) 44 अब्ज डॉलरचा सौदा करत ट्विटर ताब्यात घेतले आणि या बदलाला सुरूवात झाली. सध्या ट्विटरमध्ये होत असलेले बदल आणि निर्णय यांचीच जगभर चर्चा आहे. नुकतेच ट्विटरने भारतातील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्या कमी करण्याच्या निर्णयानुसार ट्विटरने भारतातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास (Twitter lay offs) सुरूवात केली आहे. आता याचसंदर्भात आणखी एक घटना घडत ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होते आहे. विशेष म्हणजे नोकरी गेल्यावरदेखील या कर्मचाऱ्याने आनंदात ही पोस्ट टाकली आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय भारतीय तरुण यश अग्रवाललाही ट्विटरने नोकरीवरून काढून टाकले आहे. ट्विटरमधील नोकरी गेल्यानंतरदेखील यश अग्रवालने स्वतःचा आनंदी फोटो असलेली एक पोस्ट शेअर (Yash Agrawal post) केली आहे. या फोटोत तो कमालीचा खूश दिसतो आहे. त्याने त्याच्या दोन्ही हातात उशा धरलेल्या आहेत. या उशांच्या कव्हरवर ट्विटरचा लोगो आहे. (After loosing job at Twitter Yash Agrawal writes mind blowing post)

अधिक वाचा-  स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन; आतापर्यंत 34 वेळा केलंय मतदान

ट्विटरमध्ये नोकरीची संधी ही अभिमानाची गोष्ट

यश अग्रवालने ट्विटरमधील नोकरी गेल्यानंतर एक छकास पोस्ट लिहिली आहे. त्याची नोकरी नुकतीच गेली आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, Twitter सोबत काम करणे, या टीमचा, या संस्कृतीचा एक भाग असणे हा सन्मान आहे. ट्विटरच्या टीमच्या संस्कृतीचा एक भाग बनणे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सन्मान आहे. ट्विटर व्यतिरिक्त यश अग्रवालने त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवरही ही पोस्ट शेअर केली आहे. अनपेक्षित भावना व्यक्त करणारी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अधिक वाचा : Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, विठ्ठलाकडे मागितला आशीर्वाद अन् सुबुद्धी

नोकरी गेल्यावरही प्रचंड उत्साह

नोकरी गेल्यानंतरही सकारात्मकपणे आनंदात आणि उत्साहात असलेल्या यश अग्रवालची पोस्ट लोकांना आवडते आहे. युजर्स यश अग्रवालचे जोरदार अभिनंदन करत आहेत. यशचे सोशल मीडियावर कौतुकदेखील होते आहे. एका यूजरने लिहिले की, आयुष्याकडे पाहण्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला खूप पुढे नेईल. तुम्ही जे काही करता त्यात तुम्हाला प्रचंड यश आणि आनंदाची शुभेच्छा. तर दुसऱ्या युजरने यशच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले की, नोकरी गमावल्यानंतरही इतकी ऊर्जा आणि उत्साह पाहण्यासारखा आहे. एरवी नोकरी गेल्यावर कर्मचारी निराश आणि हताश होतात. ते साहजिकच असते. मात्र यश अग्रवालच्या उत्साहाने या प्रकरणात एक वेगळाच रंग भरला आहे.

अधिक वाचा : BHANDARA । रस्त्यावर खतरनाक थरार; वाळू माफियांनी तहसीलदारांच्या गाडीवर जेसीबी अन् गोळीबार...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर मोजून ट्विटर कंपनी खरेदी केली. यानंतर ट्विटरमध्ये कर्मचारी कपात सुरू झाली. आता ट्विटरला फायद्यात आणण्यासाठी कंपनीला नव्या स्वरुपात लाँच करण्याची तयारी मस्क करत आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून ट्विटरच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे जगभरातील ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर संक्रात कोसळली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी