'Man Vs Wild'वर लोकांनी बनवले भन्नाट मीम्स 

'Man Vs Wild' शो प्रसारित झाल्यानंतर नेटीझन्स देखील चांगलेच कामाला लागले आणि त्यांनी यावर अतिशय भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

pm modi
'Man Vs Wild'वर लोकांनी बनवले भन्नाट मीम्स  (फोटो सौजन्य: डिस्कव्हरी) 

थोडं पण कामाचं

  • ट्विपल्सने 'Man Vs Wild'वर तयार केले भन्नाट मीम्स
  • पंतप्रधान मोदी आणि बेयर ग्रिल्सवर तयार केले मजेशीर मीम्स
  • पर्यावरण संरक्षणाचं पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

मुंबई: डिस्कव्हरी चॅनलवरील 'Man Vs Wild' हा शो सोमवारी रात्री नऊ वाजता प्रसारित झाला. या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अॅडव्हेंचर बेयर ग्रिल्स हे एकत्र पाहायला मिळाले. या शोची गेले काही दिवस बरीच चर्चा सुरु होती. जसा हा शो प्रसारित झाला त्यानंतर नेटीझन्स देखील कामाला लागले आणि त्यांनी या शोवर मजेशीर मीम्स देखील तयार केले. पाहता-पाहता हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागले.

'Man Vs Wild' या शोचं शूटिंग फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात करण्यात आलं होतं. शूटींग दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ग्रिल्ससोबत पर्यावरण संरक्षण, निसर्गाविषयी आपले विचार आणि आपल्या लहानपणीच्या आठवणीही शेअर केल्या. दरम्यान, या शोनंतर यूजर्सने हिंदी सिनेमा 'उरी'मधील प्रसिद्ध डायलॉग 'हाऊ इज द जोश' आणि इतर विषयासाठी जोडून अतिशय मजेशीर मीम्स देखील तयार केले. 

सोशल मीडियावर एका यूजरने असं म्हटलं आहे की, 'डिस्कव्हरी चॅनलचा टीआरपी पाहून इतर चॅनल थक्क झाले आहेत.'

'Man Vs Wild'च्या टीआरपीवर डिस्कव्हरी चॅनलची अशी काहीशी रिएक्शन पाहायला मिळतेय. 

'Man Vs Wild'शोचं प्रसारण जगातील १८० देशात झालं आहे. या शोबाबत बेयर ग्रिल्सने अनके ट्वीट केले होते. ज्यानंतर पंतप्रधान मोदींनीही याबाबत ट्वीट केले होते. पंतप्रधान मोदींनी या शोच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

याच कार्यक्रमात बोलताना मोदींनी आपल्या काकांबाबत देखील सांगितलं. 'माझ्या आजीने माझ्या काकांना लाकडाचं दुकान अजिबात सुरु करु दिलं नव्हतं. त्यासाठी तिचा ठाम नकार होता. एवढंच काय तर, लाकाडाचं दुकान सुरु करायचं ऐकल्यानंतरच माझ्या आजीचा राग अनावर झाला होता.'

पंतप्रधान मोदींनी बेयर ग्रिल्ससोबत बातचीत करताना सांगितलं होतं की, 'माझी आजी जास्त शिकलेली नव्हती. माझ्या काकांना एका लाकडाचा व्यापार करावा असं वाटलं होतं. तर त्यावेळी माझ्या आजीने त्यांना असं न करण्यास सांगितलं होतं. जेव्हा त्यांना याचं कारण विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की, 'आम्ही उपाशी मरु, पण लाकडं विकण्याचं काम अजिबात करायचं नाही.' 

मोदीच्या आजीचं असं म्हणणं होतं की, 'झाडांमध्ये देखील जीवन असतं. त्यामुळे कुणाचं जीवन हिरावून घेण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. निसर्गाकडून मला फक्त प्रेमच नाही तर संस्कार देखील मिळाले आहेत.' यावेळी बेयर ग्रिल्स पंतप्रधान मोदींना असं म्हणाला की, जिम कॉर्बेट हे खूप धोकादायक आहे. त्यामवेळी मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कबाबत म्हणाले की, 'मला नाही वाटत की, आपल्याला हा अनुभव खतरनायक मानायला हवा. जर आपण नैसिर्गासोबत सामंजस्याने वागलो तर काहीही चुकीचं घडणार नाही.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
'Man Vs Wild'वर लोकांनी बनवले भन्नाट मीम्स  Description: 'Man Vs Wild' शो प्रसारित झाल्यानंतर नेटीझन्स देखील चांगलेच कामाला लागले आणि त्यांनी यावर अतिशय भन्नाट मीम्स तयार केले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...