Bulldozer Baba Tattoo: BJP च्या विजयानंतर बुलडोझर टॅटूने घातला धुमाकूळ, पक्षाच्या समर्थकांनी हातावर गोंदले 'बुलडोझर बाबा'

व्हायरल झालं जी
Updated Mar 12, 2022 | 14:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video | उत्तर प्रदेशमध्ये विजयानंतर पक्षाच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. हा विजय साजरा करण्यासाठी भाजपा समर्थक वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. यादरम्यान वाराणसीमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. येथे भाजप समर्थकांच्या हातावर चक्क बुलडोझर बाबाचा टॅटू गोंदला आहे.

After the BJP's victory, the party's supporters carved a Baba bulldozer on their hands
BJP च्या विजयानंतर बुलडोझर टॅटूने घातला धुमाकूळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये विजयानंतर पक्षाच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
  • भाजप समर्थकांच्या हातावर चक्क बुलडोझर बाबाचा टॅटू गोंदला आहे.
  • भाजप समर्थकाने हातात बुलडोझर चालवणाऱ्या बाबांचा टॅटू काढल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bulldozer Baba Tattoo Video | मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये विजयानंतर पक्षाच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. हा विजय साजरा करण्यासाठी भाजपा समर्थक वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. यादरम्यान वाराणसीमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. येथे भाजप समर्थकांच्या हातावर चक्क बुलडोझर बाबाचा टॅटू गोंदला आहे. लोकांमध्ये या टॅटूची खूप चर्चा रंगली आहे. एका भाजप समर्थकाने हातात बुलडोझर चालवणाऱ्या बाबांचा टॅटू काढल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान टॅटू आर्टिस्ट सुमितने सांगितले की, भाजपच्या प्रचंड मोठ्या विजयानंतर लोक बुलडोझर टॅटू आणि बुलडोझरवर बाबाचे नाव लिहून घेत आहे आणि आता त्याची मागणी खूप वाढली आहे. (After the BJP's victory, the party's supporters carved a Baba bulldozer on their hands).  

अधिक वाचा : चीनच्या चांगचुनमध्ये लॉकडाऊन, आली कोरोनाची नवी लाट

योगींना मिळाले नवीन नाव 

दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत गुन्हेगार आणि माफियांवर बुलडोझर चालवण्याचा नारा देऊन बहुमताने सत्ता राखणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना 'बुलडोझर बाबा' असे नाव दिले आहे. समर्थक लखनऊ, वाराणसी आणि योगींचा स्वत:चा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरसह राज्याच्या विविध भागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाने उत्साही असलेले पक्षाचे कार्यकर्ते विजयी मिरवणुका काढताना 'बुलडोझर बाबा जिंदाबाद' असा नवा नारा देत विजय साजरा करताना पाहायला मिळाले.  

अधिक वाचा : दिल्ली कॅपिटल्सने लॉन्च केली नवीन जर्सी

विजयानंतर बुलडोझरने घातला धुमाकूळ

राजधानी लखनऊमधील भाजप कार्यालयाबाहेर काही उत्साही समर्थकांनी बुलडोझरवर स्वार होऊन भगवे झेंडे फडकावून विजय साजरा केला. भाजपचे कट्टर समर्थक सुमंत कश्यप यांनी विजयाच्या उत्साहात नकली बुलडोझर डोक्यावरून फिरवला होता. योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात गोरखपूरपमध्ये समर्थकांनी बुलडोझरच्या ताफ्यासह विजयी मिरवणूक काढली. 

मिरवणुकीदरम्यान यावेळी समर्थक 'बुलडोजर बाबा झिंदाबाद' आणि 'गुन रहा है एक ने के नाम बुलडोझर बाबा जय श्री राम'च्या घोषणा देत होते. वारणसीमध्येही समर्थकांनी बुलडोझरवर स्वार होऊन विजय साजरा केला. राज्यात पक्षाच्या विजयानंतर जनतेचे आभार मानताना उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी एका निवेदनात म्हटले की, लोकांनी कट्टर घराणेशाही, जातीवाद, गुन्हेगारीकरण आणि विरोधकांच्या प्रादेशिकतेवर मतांचा बुलडोझर चालवला आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी