ऐकलं का ! आज आहे #PMkiShaadi; राऊत-सुप्रिया सुळेंच्या डान्सनंतर पूर्वशीच्या लग्नपत्रिकेची चर्चा, नवीन हॅशटॅग होतोय व्हायरल

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी आज होत  आहे.

 #PMkiShaadi hashtag is going viral
ऐकलं का ! आज आहे #PMkiShaadi  |  फोटो सौजन्य: Google Play

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी आज होत  आहे. पूर्वशी आणि मल्हार यांच्या लग्न सोहळ्यातले, साखरपुड्याचे, संगीत कार्यक्रमाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यात पूर्वशीचे पप्पा म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुप्रिया सुळे यांच्या सोबतचा डान्स खूप व्हायरल होत आहे. आता डान्सनंतर पूर्वशीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही व्हायरल होऊ लागली आहे. त्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे या पत्रिकेवरील #PMkiShaadi हा हॅशटॅग.

संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यासाठी राजकीय वर्तुळातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या संगीत सोहळ्यादरम्यान सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी केलेला डान्स सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. पण या डान्सबरोबर आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे या लग्नाची पत्रिका. या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Malhar) या नावातील एम (M) या आद्याक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. हा हॅशटॅग लग्नपत्रिकेवर छापण्यात आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, राऊत यांच्या कन्येचा लग्नसोहळा आज 29 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. त्याआधी काल (29 नोव्हेंबर) प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीत संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही सहकुटुंब उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी