Viral Video: जेव्हा वृद्धाच्या कुर्त्यात शिरला साप; पाहा पुढे काय झालं!

व्हायरल झालं जी
Updated Jun 25, 2019 | 21:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video: महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये एका माणसाच्या कपड्यांमध्ये साप निवांत झोपलेला होता. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीला याची जाणीवही झालेली नव्हती. त्या सापाची सुटका करून जंगलात सोडण्यात आले.

Snake in shirt of old man
बचाव पथकाने सापाची केली सुटका   |  फोटो सौजन्य: YouTube

नवी दिल्ली : सापाचं नाव घेतलं तरी थरकाप उडतो. हृदयाची धडधड वाढते. जर, साप चावला तर, क्वचितच एखाद्याचा जीव वाचल्याचं ऐकायला मिळतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. पण, तुम्ही कधी सापाला एखाद्या माणसाच्या जवळ झोपलेले पाहिले आहे का? किंवा एखाद्या माणसाला सापाजवळ निश्चिंत झोपल्याचं पाहिलं आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. विश्वास ठेवा हे सत्य आहे आणि तुम्ही हे तुमच्या डोळ्याने पाहू शकता. साप-माणसाची ही धक्कादायक मैत्री आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका हॉस्पिटलमध्ये एका माणसाच्या कपड्यांमध्ये साप निवांत झोपलेला होता. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीला याची जाणीवही झालेली नव्हती. सापाचा माणसासोबत झोपलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिरला साप

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला एक वृद्ध व्यक्ती जिल्हा सिव्हील हॉस्पिटलमध्ये फरशीवरच झोपलेले दिसतात. त्यांनी पांढरं धोतर आणि कुर्ता, असा महाराष्ट्रीय पारंपरिक पेहराव केला आहे. त्यातच एक साप त्यांच्या कुर्त्यांमध्ये घुसला असून, तो निवांत झोपलेला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, त्या वृद्धला याची माहितीदेखील नव्हती की त्याच्या कुर्त्यांमध्ये साप घुसलेला आहे. अचानक सापाच्या हालचालींवर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी नजर पडली. त्यांनी तातडीने वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमला याची माहिती दिली. ही घटना पहाटे साडे तीन वाजताची आहे. वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अतिशय नाजूक हाताळणी करत सापाला कुर्त्यातून बाहेर काढले आणि जंगलात सोडून दिले. या व्हिडिओतून संबंधित वृद्ध व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही.

 

 

‘सापाला मारू नका’

या संदर्भात वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार, या सापाला ग्रास स्नेक असे म्हटले जाते. विशेष म्हणजे हा साप विषारी नसतो. साप चावल्यास जीवाला कोणताही धोका नसतो. रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार संबंधित वृद्ध व्यक्ती एका अंगावर झोपली होती. त्यामुळं सापाला कोणताही त्रास झाला नाही आणि तो आरामात झोपला होता. जर, संबंधित वृद्ध व्यक्ती एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झाली असती तर, साप त्यांना चावला असता. आपल्या आजूबाजूला अनेकवेळा साप दिसतात. पण, त्यांना मारून टाकण्यात येते. साप हा निसर्गाचाच एक भाग असल्यानं त्याला पकडून जंगलात सोडून द्यायला हवे. सापाला मारून टाकणे निसर्ग चक्रासाठी घातक असल्याचे वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral Video: जेव्हा वृद्धाच्या कुर्त्यात शिरला साप; पाहा पुढे काय झालं! Description: Viral Video: महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये एका माणसाच्या कपड्यांमध्ये साप निवांत झोपलेला होता. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीला याची जाणीवही झालेली नव्हती. त्या सापाची सुटका करून जंगलात सोडण्यात आले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola