AI create billionaires images goes viral: सध्याच्या काळात सोशल मीडियात AI ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. AIने विविध फोटोज बनवले असून ते फोटोज युजर्सला खूप आवडत सुद्धा आहेत. त्याच प्रमाणे एआयच्या मदतीने एका आर्टिस्टने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना गरीब दाखवण्यात आलं आहे. हे फोटोज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून ते फोटोज पाहून तुम्हीही अवाक् व्हाल...
व्हायरल होत असलेले फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोजला आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लाईक्स सुद्धा मिळाले आहेत. एका युजरने पोस्टवर लिहिलं, 'एलॉन मजदूर', दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं वॉरेन बफेट येथेही श्रीमंतच वाटत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ट्रम्प स्त्री वाला. इतकेच नाही तर काही युजर्सने मोदी, अदानी आणि रतन टाटा कुठे आहेत.
हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय
फोटोजमध्ये पाहू शकता की, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प हे झोपडीसमोर उभे आहेत. त्यांचे केस विस्कटलेले आहेत आणि सफेद बनियान परिधान केली आहे. तर बिल गेट्स शर्टशिवाय उभे दिसत आहेत. मुकेश अंबानी सुद्धा सर्वसाधारण कपड्यांमध्ये दाखवण्यात आले आहेत.
हे पण वाचा : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची योग्य पद्धत माहितीये का?
याव्यतिरिक्त वॉरेन बफेट आणि मार्क झुकरबर्ग यांनाही काहीसे अशाच प्रकारे दाखवण्यात आले आहे. सर्व श्रीमंतांना या एआय फोटोजमध्ये गरीब दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे हे अब्जाधीश जर गरीब असते तर कसे दिसले असते ते दाखवण्यात आले आहे.
हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा
Mark Zuckerberg for @LouisVuitton pic.twitter.com/uxF2lf3ind — Andrew Kean Gao (@itsandrewgao) March 29, 2023
AI ने बनवलेले आणखी काही फोटोज व्हायरल होत आहेत ज्यामध्ये एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांना लुइस वुइटन, बालेंसीगा आणि विविएन वेस्टवूड यासारख्या फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक करताना दाखवण्यात आले आहे. खास बाब म्हणजे हे फोटोज पाहून ट्विटर आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनाही प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरता आला नाही.