Viral News: धक्कादायक! एड्सबाधित काकीने रचला कट; अल्पवयीन पुतण्याशी ठेवले शारिरीक संबंध

व्हायरल झालं जी
Updated Apr 05, 2022 | 15:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aunty assaults nephew | उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील रूद्रपूरमध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जिथे एका २३ वर्षीय महिलेने आपल्या भावजयीच्या अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात फसवून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. खरं तर ही महिला एचआयव्ही ग्रस्त आहे.

AIDS-infected aunt plotted, Sexually Relationship with a minor nephew
एड्सबाधित काकीने रचला कट, अल्पवयीन पुतण्याशी ठेवले संबंध  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील रूद्रपूरमध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली.
  • काकीनेच ठेवले अल्पवयीन पुतण्याशी संबंध.
  • संबंधित महिला एड्स बाधित असल्याचे उघड झाले आहे.

Aunty assaults nephew | डेहराडून : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधमसिंह नगर जिल्ह्यातील रूद्रपूरमध्ये (Rudrapur) माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जिथे एका २३ वर्षीय महिलेने आपल्या भावजयीच्या अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात फसवून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. खरं तर ही महिला एचआयव्ही ग्रस्त आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्या महिलेला तिच्या भावजयीच्या मुलाला एचआयव्ही संक्रमित करायचे होते. आरोपी महिलेच्या पतीला देखील एड्सची लागण झाली असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (AIDS-infected aunt plotted, Sexually Relationship with a minor nephew). 

अधिक वाचा : नांदेडमध्ये बिल्डरवर गोळ्या झाडून खून

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रूद्रपूर ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारी महिला तिच्या पिलीभीत, पुरनपूर या गावी गेली होती. जिथे तिचा पुतण्या पहिल्या पासून उपस्थित होता. महिलेने मुलाला आपल्या जाळ्यात फसवून त्याच्याशी संबंध ठेवले. काही दिवसांनी हा मुलगा त्याच्या नातेवाईकांसह संक्रमण शिबिरात आला तेव्हा महिलेने (त्याच्या काकीने) पुन्हा एकदा त्याच्याशी संबंध ठेवले. मात्र नंतर त्याची काकी एचआयव्ही ग्रस्त असल्याची माहिती मिळाल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मुलाचे आयुष्य बरबाद केले - नातेवाईक 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आरोपी म्हणजेच मुलाच्या काकीने मुलाचे आयुष्य बरबाद करण्याचे उद्देशाने हे संबंध ठेवल आहेत. तसेच ही घटना समजल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी