Secrets of airlines : एअरहोस्टेस कधीच पीत नाहीत विमानातील कॉफी, सत्य ऐकून वाटू लागेल मळमळ

विमान प्रवासात एअर होस्टेस कधीच कॉफी किंवा चहा का पित नाहीत, याचं रहस्य एका हवाई सुंदरीनं नुकतंच उघड केलं आहे.

Secrets of airlines
एअरहोस्टेस कधीच पीत नाहीत विमानातील कॉफी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विमानातील चहा-कॉफीबाबत एअर होस्टेसने फोडलं गुपित
  • पाण्याची टाकी होत नाही साफ
  • विमानातील केबिन क्रूची जाहीर केली गुपितेे

Secrets of airlines : विमान प्रवासात आपण अनेकदा चहा किंवा कॉफी पितो. विमानात बसल्यावर चहा-कॉफी पिण्यात अनेकांना मजाही वाटते आणि हौस म्हणून ते चहा किंवा कॉफी विकत घेऊन पितात. मात्र विमानातील एअरहॉस्टेस किंवा कॅबिन क्रू कधीच तिथे चहा, कॉफी पिताना दिसत नाही. याचं खरं कारण जर समजलं, तर अनेकजण विमानात या पेयांचं सेवन करणं सोडून देतील. पुन्हा विमानात चहा मागवण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील. एअर हॉस्टेस असणाऱ्या सिएरा मिस्ट हिने टिकटॉकवर याबाबतची काही गुपितं उघड केली आहेत. सिएराचं टिकटॉकवर 31 लाख फॉलोअर्स आहेत आणि या प्लॅटफॉर्मवरून ती आपल्या कामाबाबतीतील काही गोष्टी पोस्ट करत असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Cierra Mistt (@cierra_mistt)

उघड केलं गुपित

सिएरानं विमानातील चहा आणि कॉफीबद्दल काही गुपितं उघड केली आहेत. पायलट आणि अटेंडंट यांच्याबाबतच्या काही सिक्रेट गोष्टी तुम्हाला सांगते असं म्हणत तिने काही बाबींचा खुलासा केला आहे. चहा आणि कॉफी तयार करण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करण्यात येतो, त्याविषयी मी काही गुपितं सांगणार आहे, जी तुम्हाला नक्कीच माहित नसतील, असं तिनं म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Miracle : पिल्लू खड्ड्यात पडल्यामुळे हत्तीण झाली बेशुद्ध, मग घडला चमत्कार, पाहा VIDEO

टाकीच्या स्वच्छतेचा प्रश्न

चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी ज्या टाकीतून पाणी घेतलं जातं ती टाकी नियमितपणे साफ केली जात नाही, असं सिएरानं म्हटलं आहे. विमानात जेव्हा जेव्हा कुणी चहा किंवा कॉफीची ऑर्डर करतं, तेव्हा ज्या नळातून आम्ही पाणी घेतो, त्याची टाकी साफ केलेली नाही, हे आम्हाला माहित असतं. त्यामुळे त्यातील पाणी पिण्याची आमची इच्छाच होत नाही. अर्थात, हे पाणी स्वच्छ असतं. त्या पाण्याची वेळोवेळी तपासणी केली जाते आणि पिण्याच्या सर्व निकषांवर ते योग्य आहे की नाही, हे तपासलं जात असल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे. मात्र तरीही जोपर्यंत त्या पाण्याच्या परिक्षणात काही त्रुटी आढळत नाहीत, तोपर्यंत टाकी साफ केली जात नाही. त्यामुळे पाणी शुद्ध असलं तरी टाकी स्वच्छ नाही, हे आम्हाला माहित असतं. त्यामुळेच विमानातील पायलट किंवा केबिन क्रूची ते पाणी पिण्याची इच्छाच होत नसल्याचं सिएरानं म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून

म्हणून लावतात सनस्क्रीन

एअर होस्टेस आणि विमानातील नियमित कर्मचारी हे कायम सनस्क्रीन लावत असल्याचं तिनं म्हटलं आहे. आम्ही दररोज जवळपास 35 हजार फूट उंचीवर असतो. ओझोनच्या थरापासून आम्ही अगदी जवळ असतो आणि अतिनील किरणांचा प्रभाव आमच्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आम्ही सनस्क्रीनचा वापर करतो, असं तिनं म्हटलं आहे. ॲस्ट्रॉनॉट्स आणि रेडियॉलॉजिस्ट यांच्या श्रेणीत आमची गणती केली जाते, ती त्यामुळेच; असंही तिने म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी