काय खरचं एअर इंडिया दिवाळखोर झाली आहे, जाणून घ्या व्हायरल बातमी मागचं सत्य

व्हायरल झालं जी
Updated May 15, 2019 | 21:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Air India Bankrupt: एअर इंडीयाच्या दिवाळखोर होण्याची बातमी वेगाने पसरत आहे. ही बातमी इस्रायलमध्येही पसरली आहे. ही बातमी खरी आहे का याबाबत अनेकांनी इंटरनेटवर सर्च केले आहेत. तर जाणून घ्या या बातमी मागचं सत्य...

Air India Bankrupt
एअर इंडिया दिवाळखोर  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: भारताची राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडिया दिवाळखोर झाल्याची बातमी इस्रायलमधील माध्यमामध्ये झपाट्याने पसरत आहे. पण या बातमीचे एअर इंडियाकडून खंडण करण्यात आले आहे. ही बातमीला तथ्यहीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, इस्रायलच्या प्रवाशांनी  नेहमी दिल्लीच्या प्रवासासाठी नेहमीच एअर इंडियाला पसंती दर्शवली आहे. एअर इंडियाने या प्रवाशांच्या शंका दूर केल्या आहेत.  इस्रायल मीडियाच्या एका ठराविक वर्गाकडून तसेच काही वेब पोर्टलच्या माध्यमातून अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे सांगितले. इस्रायल मीडियानुसार एअर इंडियावर अब्जावधी डाॅलर्सचे कर्ज आहे. तसेच एअर इंडियाचे तिकिट बूक केलेल्या प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत वसूल करण्याचा सल्लाही दिला आहे.    

मात्र एयर इंडियाच्या तेल-अवीव कार्यालयाला याबद्दल विचारले असता, त्यांनी या सगळ्या बातम्यांना खोटे सांगितले आहे. एअर इंडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न माध्यमांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देत असल्याचेही एअर इंडिया तेल-अवीव कार्यालयाकडूल सांगण्यात आले.  

एअर इंडियाचे इस्राइलमधील कंट्री मॅनेजरांना विचारले असता ते म्हणाले, “ही एक खोटी बातमी आहे, वास्तविक पाहता एअर इंडिया तेल अवीव ते दिल्ली दरम्यान फेऱ्या वाढविण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितलं.” तसेच एअर इंडियाबद्दलच्या अफवा, विश्वासार्हतेला तडा पोहोचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच त्यांनी या वृत्तांचे खंडण यावेळी केलं आहे.

जेट बंद पडल्याने भीतीचे वातावरण 

याआधी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. जेट एअरवेजला वाचवण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची मागणीही कर्मचाऱ्याकडून झाली होती. जेट एअरवेजच्या बंद पडल्यामुळे प्रवाशांवरही याचा परिणाम झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडिया सुद्धा डबघाईला पोहचली आहे. ती कधीही बंद होऊ शकते अशा वावड्या उठल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी