शंभराव्या वाढदिवशी पोलिसांनी महिलेला केली अटक

Ajab Gajab News Offbeat News woman arrested on her 100th birthday Reason Will Surprised you : जगातील प्रत्येकासाठी वाढदिवस हा खास असतो. अनेकजण लक्षात राहावा म्हणून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. काही जण जोरदार पार्टी करतात तर काही जण साधेपणाने वाढदिवस साजरा करतात. पण एखाद्या व्यक्तीला वाढदिवशीच अटक झाली तर...

Ajab Gajab News Offbeat News woman arrested on her 100th birthday Reason Will Surprised you
शंभराव्या वाढदिवशी पोलिसांनी महिलेला केली अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शंभराव्या वाढदिवशी पोलिसांनी महिलेला केली अटक
  • जगातील प्रत्येकासाठी वाढदिवस हा खास असतो
  • एखाद्या व्यक्तीला वाढदिवशीच अटक झाली तर...

Ajab Gajab News Offbeat News woman arrested on her 100th birthday Reason Will Surprised you : जगातील प्रत्येकासाठी वाढदिवस हा खास असतो. अनेकजण लक्षात राहावा म्हणून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. काही जण जोरदार पार्टी करतात तर काही जण साधेपणाने वाढदिवस साजरा करतात. पण एखाद्या व्यक्तीला वाढदिवशीच अटक झाली तर...

विना कपडे या ठिकाणी बिनधास्त साजरा करा हनीमून

जान्हवीप्रमाणेच खुशी कपूरही आहे बोल्ड, पहा फोटो

ऋषभ पंतच्या बहिणीची आयपीएल स्टारसोबत लंडनमध्ये धमालमस्ती

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने कोणाला केलं बर्थडे विश, म्हणाली- I Love u

ऑस्ट्रेलिया या देशातील व्हिक्टोरिया प्रांतात एका महिलेला शंभराव्या वाढदिवशीच अटक झाली. पोलीस पथक आले आणि महिलेला अटक केली.

शंभरावा वाढदिवस साजरा करणारी महिला तिच्या तरुणपणी नर्सची नोकरी करत होती. नर्स म्हणून अनेकांची सेवा करणाऱ्या या महिलेला मरण्याआधी आयुष्यात एकदा तरी पोलिसांनी आपल्याला अटक करावी अशी इच्छा होती. ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महिलेच्या ओळखीतल्यांनी पोलिसांशी चर्चा केली आणि तिच्या अटकेची सोय केली होती. तीन पोलिसांचे एक पथक महिलेच्या शंभराव्या वाढदिवशी तिला अटक करण्यासाठी आले होते.

पोलिसांनी महिलेच्या हातात हातकडी अडकवून तिला अटक केली. अटक केल्यानंतर थोड्याच वेळात महिलेची सुटका करण्यात आली. यानंतर महिलेसोबत पोलीस पथकाने फोटो काढून घेतले. नंतर पोलीस पथकाने महिलेला शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. थोडा वेळ पोलीस पथक महिलेच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले. 

शंभरावा वाढदिवस साजरा करणाऱ्या महिलेचे नाव जीन बिकेनटन असे आहे. जीनची इच्छा मृत्यूआधी एकदा स्वतःला अटक करून घेण्याची होती. ही इच्छा तीन पोलिसांच्या सहकार्याने तिने पूर्ण करून घेतली. ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर सध्या जीनच्या वाढदिवसाची तसेच तिच्या अनोख्या इच्छेची जोरदार चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी