ऐका, जॅक मा यांचा नवदाम्पत्याला सेक्सविषयी मोलाचा सल्ला

व्हायरल झालं जी
Updated May 14, 2019 | 21:53 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Jack Ma: 'कामाच्या बाबतीत मी 996 हा फॉर्म्युला फॉलो करण्याचा सल्ला देतो. पण, खासगी आयुष्यात तुम्ही 669 हा फॉर्म्युला फॉलो केला पाहिजे,’ असा सल्ला अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिला.

Jack Ma
जॅक मा यांचा सेक्सविषयी सल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जॅक मा यांचा नवदाम्पत्यांना सेक्स विषयी सल्ला
  • सामूदायिक विवाह सोहळ्यात आठवड्यातून सहा वेळा सेक्स करण्याचा सल्ला
  • जॅक मा यांच्यावर सोशल मीडियावर टीका

बीजिंग: अलिबाबा या जगातील सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटचे संस्थापक जॅक मा सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किती वेळा सेक्स कारायला पाहिजे, याचा सल्ला दिला आहे. अर्थात तो देखील छुप्या संदेशातून दिला आहे. यावरून त्यांना सोशल मीडियावर लक्ष देखील केलं जात आहे. तर, काहींनी हा विषय हसण्यावारी सोडून दिला आहे. पण, दोन्ही पद्धतींमधून जॅक मा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

एकेकाळी इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून टूर गाईडचे काम करणारे जॅक मा सध्या जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. alibaba.com आणि aliexpress.com या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे विश्व निर्माण केले आहे. सध्या चीनच नव्हे तर, भारतासह इतर देशांतही या वेबसाईट्स लोकप्रिय आहेत. जॅक मा यांच्या उद्योगसमूहात गेल्या वर्षीच्या आकड्यांनुसार जवळपास 66 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना जॅक मा नेहमीच यशाची गुरु किल्ली देत असतात. यापूर्वी इंग्रजी आकड्यांनुसार 996 चा यशाचा मंत्र दिला होता. या आकड्यानुसार आठवड्यातील सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ फक्त काम करण्याचा सल्ला जॅक मा यांनी दिला होता. अशा प्रकारे कष्ट करूनच तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता, असं जॅक मा यांनी म्हटलं होतं.

सेक्स विषयी जॅक मा काय म्हणतात?

जॅक मा म्हणाले, ‘कामाच्या बाबतीत मी 996 हा फॉर्म्युला फॉलो करण्याचा सल्ला देतो. पण, खासगी आयुष्यात तुम्ही 669 हा फॉर्म्युला फॉलो केला पाहिजे.’ जॅक मा यांच्या सल्लानुसार त्यांना 669 या आकड्यातून सहा दिवस सहा वेळा सेक्स करण्याचा सल्ला दिला आहे. जॅक मा यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात नवदाम्पत्यांना हा सल्ला दिला आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, जॅक मा दर वर्षी उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. दर वर्षी 10 मे रोजी हा कार्यक्रम पार पडतो. त्यात त्यांनी यंदा नवदाम्पत्यांना 669 चा सल्ला दिल्याने सोशल मीडियावर त्यांना प्रतिक्रियांना तोंड द्यावं लागतंय. काहींनी त्यांच्या या सल्ल्याला हसण्यावारी सोडून दिलंय तर, काहींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोन्ही पद्धतीने म्हणजेच आठवडाभर 669 केल्यावर 996 साठी ताकद राहणार नाही आणि आठवडाभर 996 केल्यावर 669 साठी वेळ मिळणार नाही, अशी दोन्हीकडची मतं व्यक्त होऊ लागली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी