Viral Video: आरारा खतरनाक! चक्क लोकल ट्रेनमधून प्रवास करतोय घोडा, व्हिडिओ होतोय व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Apr 09, 2022 | 11:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Horse Travelling In Local Train । सोशल मीडियावर जर तुम्ही सक्रिय असाल तर तुम्हाला देखील सतत काही ना काही नवीन आणि चकित करणारे पाहायला मिळू शकते. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी पाहून मनाला आनंद होतो. तर काही गोष्टी अशा देखील असतात ते पाहून आपल्याला देखील हसू आवरत नाही.

Amazing Horse traveling on a local train, video goes viral
चक्क लोकल ट्रेनमधून प्रवास करतोय घोडा, व्हिडिओ होतोय व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चक्क लोकल ट्रेनमधून प्रवास करतोय घोडा, व्हिडिओ होतोय व्हायरल.
  • हा व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालचा आहे.
  • हा घोडा सियालदह-डायमंड हार्बर डाऊन लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होता.

Horse Viral Video । मुंबई : सोशल मीडियावर जर तुम्ही सक्रिय असाल तर तुम्हाला देखील सतत काही ना काही नवीन आणि चकित करणारे पाहायला मिळू शकते. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी पाहून मनाला आनंद होतो. तर काही गोष्टी अशा देखील असतात ते पाहून आपल्याला देखील हसू आवरत नाही. दरम्यान अशीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला ती व्यक्ती देखील चकित झाली आहे. कारण एक घोडा चक्क लोकल ट्रेनमधून प्रवास करत होता. (Amazing Horse traveling on a local train, video goes viral). 

अधिक वाचा : 'मला जबरदस्तीने संघातून काढले', रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

अनेक ठिकाणी लोकल ट्रेनमध्ये लहान-मोठे प्राणी माणसांसोबत प्रवास करताना तुम्ही पाहिले असतील.पण जर तुम्हाला विचारले गेले की, तुम्ही कधी एखादा मोठा प्राणी किंवा घोडा माणसांसोबत फिरताना पाहिला आहे का? तुमचे उत्तर नक्कीच नाही असेल. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक घोडा लोकांसोबत ट्रेनमध्ये प्रवास करत आहे. हे दृश्य पाहून लोक थक्क झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये घोडा कसा आरामात उभा आहे आणि प्रवासाचा आनंद घेत आहे. हा सगळा प्रकार एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतोय घोडा

व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हा व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालचा आहे. हा घोडा सियालदह-डायमंड हार्बर डाऊन लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होता. यावेळी घोड्याचा मालकही तिथे उपस्थित होता. एवढेच नाही तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पूर्व रेल्वेनेही त्याची सत्यता तपासण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. खरं तर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे आणि लोक त्यावर विविध भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी