मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाळेतली काही मुले त्यांच्या कलाविष्काराने सर्वांना मंत्रमुग्ध करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा स्वत:ला शेअर करण्यापासून रोखू शकले नाहीत. (Amazing timepass of school kids on the bench, watching the video and bowing to the IPS officer ...)
कोरोना महामारीमुळे शाळा, कॉलेजला सुट्टी होती. मिळालेल्या सुट्टीत घरात बसून करायचे काय? असा विचार प्रत्येकाला पडलेला दिसतो. पण सक्तीने मिळालेल्या सुटीला संकट न समजता, वेळेचा सदुपयोग करण्याकडे अनेक कुटुंबांचा कल असल्याचे दिसत आहे. त्यातही काही मुलांनी विविध कलागुण शिकून घेतले. काही जणांनी विविध खेळ खेळण्याचा आनंद लुटला. आता हळूहळू सर्वत्र शाळा सुरु होत आहेत. अशा वेळी ही मुलं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रमताना दिसतं आहेत. जेव्हा ती मुलं शाळेच्या मध्यल्या सुट्टीत आपल्या कलागुण सादर करुन टाईम पास करत आहेत. पण काहींचा हा टाईम पास पाॅझिटिव्हही असतो. त्याच एक उदाहरण आपल्या सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे .
काही मुले त्यांच्या आवाजात सर्वोत्कृष्ट गाणे गात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांचा आवाज इतका गोड आहे की लोक या मुलांचे कौतुक करत आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्याने एक कॅप्शनही शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - इतके लहान वय आणि इतके अप्रतिम गायन आणि वादन प्रतिभा. लहान मुलांना ही कला शिकवणाऱ्या गुरुला सलाम... (हार्मोनियम काही कमी नाही)