Viral News : ऑर्डर केलेल्या सॅण्डविचमध्ये मिळाले हजारो रुपये, त्यानंतर महिलेने केलेल्या या कृत्यामुळे लोक झाले आश्चर्यचकित

या जगात कुणाचे नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. एका महिलेने खाण्यासाठी सॅण्डविच ऑर्डर केले, या महिलेचे नशीब एवढे चांगले होते की त्यात तिला भरपूर सारे पैसे सापडले. एवढे सारे पैसे सापडल्यानंतर ही महिला खुश झाली. परंतु या महिलेने त्यानंतर जे काही केले ते ऐकून लोक आश्चर्यचकित झाले.

money in sandwich
सॅण्डविचमध्ये मिळाले हजारो रुपये, महिलेने केले हे काम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या जगात कुणाचे नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही.
  • एका महिलेने खाण्यासाठी सॅण्डविच ऑर्डर केले, या महिलेचे नशीब एवढे चांगले होते की त्यात तिला भरपूर सारे पैसे सापडले.
  • एवढे सारे पैसे सापडल्यानंतर ही महिला खुश झाली.

Viral News:  या जगात कुणाचे नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. एका महिलेने खाण्यासाठी सॅण्डविच ऑर्डर (order Sandwich) केले, या महिलेचे नशीब एवढे चांगले होते की त्यात तिला भरपूर सारे पैसे (lots of money) सापडले. एवढे सारे पैसे सापडल्यानंतर ही महिला खुश झाली. परंतु या महिलेने त्यानंतर जे काही केले ते ऐकून लोक आश्चर्यचकित झाले. (America women got 43 thousand dollars in sandwich packet she return to manager viral video)

अधिक वाचा :  Viral Video : पिंजऱ्यात आलेल्या माणसावर सिंहीणीने मारली उडी आणि...

अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये राहणार्‍या जोआन ओलिवर ही महिला बाहेर जात होती. तेव्हा रस्त्यात जोआनला भूक लागली, तेव्हा जोआनने केएफसीच्या ड्राईव्ह थ्रू मधून सॅण्डविच ऑर्डर केले होते. सॅण्डविच ऑर्डर करून जोआन एका बाजूला उभी राहिली. जोआनला सॅण्डिविचचे पॅकेट मिळाल्यानंतर तिने उघडले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या पॅकेटमध्ये ४३ हजार डॉलर्स होते. केएफसीच्या कॅश काऊंटरमधून चुकून हे पैसे जोआनच्या पार्सलमध्ये आले होते. 

अधिक वाचा :  Snake inside locker : लॉकर उघडताच सापाने केला हल्ला, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मन करा घट्ट


इमानदारी दाखवली

सॅण्डविचच्या पार्सलमध्ये पैसे मिळाल्यानंतर जोआनने हे पैसे मोजले. त्यात ४३ हजार डॉरल्स होते(भारतीय रुपयांत ३४ लाख ३६ हजार रुपये). एवढे पैसे मिळाल्यानंतर कुणालाही आनंद होईल आणि लोभाने एखादी व्यक्ती हे पैसे आपल्याक्डे ठेवेल. परंतु यावेळी जोआनने इमानदारी दाखवली. जोआनने पोलिसांना फोन केला आणि केएफसीकडे पैसे परत केले. त्यांच्या कमामुळे मॅनेजरची नोकरी वाचली. आपण वाईट केले तर आपल्यासोबतही वाईट होईल अशी भावना जोआनने व्यक्त केली. सोशल मीडियावर जोआनच्या या कामाची प्रशंसा होत आहे. 

अधिक वाचा :  Love Story: 50 वर्षीय महिला 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आणि मग....

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी