Rare Blue Lobster : अमेरिकन मासेमाराला सापडला अत्यंत दुर्मिळ निळा लॉबस्टर, पाहा कसा असतो

Viral Blue Lobster : समुद्र हा आजही मानवासाठी गूढ ठिकाण आहे. समुद्राच्या( Ocean) पोटात नेमके काय काय दडले आहे याचे आकलन आपल्याला आजही पूर्णपणे झालेले नाही. अनेक अद्भूत, आश्चर्यकारक जीव समुद्रात वावरत असतात. कधीतरी त्यातील काही आपल्या समोर येतात आणि निसर्गाच्या किमयेने आपल्याला थक्क करतात. निळा लॉबस्टर हा असाच एक सुंदर आणि दुर्मिळ जीव आहे.अमेरिकेतील एका मच्छिमाराने अलीकडेच एक अत्यंत दुर्मिळ निळा लॉबस्टर (Rare Blue Lobster) पकडला आहे.

Viral Blue Lobster
व्हायरल झालेला निळा लॉबस्टर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • लार्स-जोहान लार्सन या मच्छीमाराने त्याने पकडलेल्या निळ्या लॉबस्टरचे छायाचित्र पोस्ट केले
  • पोर्टलँडच्या किनाऱ्यावर हा अद्भूत निळा लॉबस्टर सापडला होता
  • निळे लॉबस्टर हे अत्यंत दुर्मिळ असून ते लाखांमध्ये एक असतात

One in two million, blue lobster : न्यूयॉर्क : समुद्र हा आजही मानवासाठी गूढ ठिकाण आहे. समुद्राच्या( Ocean) पोटात नेमके काय काय दडले आहे याचे आकलन आपल्याला आजही पूर्णपणे झालेले नाही. अनेक अद्भूत, आश्चर्यकारक जीव समुद्रात वावरत असतात. कधीतरी त्यातील काही आपल्या समोर येतात आणि निसर्गाच्या किमयेने आपल्याला थक्क करतात. निळा लॉबस्टर हा असाच एक सुंदर आणि दुर्मिळ जीव आहे.अमेरिकेतील एका मच्छिमाराने अलीकडेच एक अत्यंत दुर्मिळ निळा लॉबस्टर (Rare Blue Lobster)  पकडला आहे. लाखो लॉबस्टरमध्ये एखादचा निळा लॉबस्टर असतो इतका हा दुर्मिळ आहे. लार्स-जोहान लार्सन (Lars-Johan Larsson)अशा या मासेमाराचे नाव असून त्याने ट्विटरवर (Twitter) या दुर्मिळ जीवाचे छायाचित्र पोस्ट केले. लार्सनच्या या पोस्टकडे सर्वच जगाचे लक्ष वेधले गेले असून ती पोस्ट व्हायरल (Vira Post)झाली आहे. कधीही न पाहिलेल्या अशा निळ्या लॉब्सटरला पाहून लोक थक्क होत आहेत. (American fisherman catches rare blue lobster, his post goes viral on social media)

अधिक वाचा : गर्लफ्रेंडच्या धूर्तपणाला कंटाळून प्रियकराने केले ब्रेकअप, पत्रात लिहंल... मोठा भाऊ म्हणून माफ कर!

अमेरिकन मासेमाराला सापडला दुर्मिळ निळा लॉबस्टर

लार्स-जोहान लार्सन हा अमेरिकेतील एक मासेमार असून त्याने निळ्या लॉबस्टरचा पोटो पोस्ट केला आहे. लार्सनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "हा निळा लॉबस्टर काल पोर्टलँडच्या किनार्‍यावर पकडला गेला आणि त्याची वाढ होण्यासाठी त्याला परत पाण्यात सोडण्यात आले. निळे लॉबस्टर हे वीस लाखांमध्ये एखादेच असतात."

नेटिझन्सने दिल्या लॉबस्टरवर प्रतिक्रिया

या दुर्मिळ आणि सुंदर निळ्या लॉबस्टरबद्दल नेटिझन्सने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबद्दल नेटिझन्स काय म्हणाले ते पाहा

"अरे देवा, हे कधीच पाहिलं नाही. तो लाल ऐवजी निळा कशामुळे झाला?" असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की
"हा एक विनोदच आहे! ब्लू लॉबस्टर्सबद्दल कधीच ऐकले नाही!"

अधिक वाचा: Weird Job Advertisement : केवळ आळशी आणि दुःखी लोकांसाठी नोकरीची संधी, अट फक्त एकच

कसे असतात लॉबस्टर

लॉबस्टर सहसा मातक्या तपकिरी किंवा लाल रंगाचे असतात. एक निळा लॉबस्टर अत्यंत दुर्मिळ असतो आणि मेन युनिव्हर्सिटीच्या लॉबस्टर इन्स्टिट्यूटनुसार निळा लॉबस्टर सापडण्याची शक्यता वीस लाख लॉबस्टरमध्ये एकाचीच असते.  त्यांच्या रंगामुळे त्यांना समुद्राच्या खडकाळ तळावर वावरण्यास मदत होते आणि संरक्षण मिळते. निळ्या रंगाचे ते चटकन कोणाच्याही लक्षात येत नाहीत. 

अधिक वाचा: Drunk Groom : दारुच्या नशेत धुंद होता नवरदेव, पत्नीऐवजी मेहुणीलाच घातली वरमाला, VIDEO होतोय व्हायरल

निळा रंग का मिळतो लॉबस्टरला

निळ्या लॉबस्टरला अनुवांशिक विकृतीमुळे त्यांचा रंग प्राप्त होतो. ज्यामुळे ते इतरांपेक्षा विशिष्ट प्रथिने अधिक तयार करतात. अर्थात गंमतीची गोष्ट म्हणजे हे निळे लॉबस्टर शिजवल्यावर त्यांचा रंग लाल होतो.

सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी अद्भूत, जगावेळी किंवा आश्चर्यकारक वस्तू किंवा बाब लपून राहत नाही. स्मार्टफोनमुळे लोक लगेच याचे फोटो किंवा व्हिडिओ बनवतात आणि तात्काळा ते सोशल मीडियावर शेअर करतात. लक्ष वेधून घेणारी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ लगेच व्हायरल होतो आणि त्याची जोरदार चर्चादेखील होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी