फेसबुक, प्रेम आणि लग्न... अमेरिकवरुन तरुणी थेट भारतात, ते देखील लग्नासाठी!

एका अमेरिकन तरुणीने पंजाबमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. या लग्नासाठी तरुणी थेट अमेरिकून पंजाबमध्ये आली आहे.

us_woman
अमेरिकवरुन तरुणी थेट भारतात, ते देखील लग्नासाठी!  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • एमिनी आणि पवन यांची ७ महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली आहे भेट 
  • पवन एका खासगी ऑटोमोबाइल कंपनीत मॅकेनिक आहे
  • दोघांनी हिंदू परंपरेनुसार अमृतसरमध्ये केलं लग्न 

अमृतसर: साता समुद्रापार अमेरिकेतील एका तरुणी भारतातील तरुणाच्या प्रेमात पडली. ही प्रेमात एवढी आकंठ बुडाली की तिने थेट त्या तरुणाशी लग्नच केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणीने तरुणाशी लग्न केलं ते देखील थेट भारतात येऊन. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील या तरुणीने भारतातील ज्या तरुणाशी लग्न केलं तो सध्या एक खासगी ऑटोमोबाइल कंपनीत स्कूटर मॅकेनिक आहे. त्यामुळे त्याला अमेरिकेला जाऊन लग्न करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तरुणीनेच थेट भारतात येण्याचा निर्णय घेतला. 

मीडिया रिपोर्टनुसार, एमिनी वोलिनी ही अमेरिकत राहत होते. पण एमिनी पंजाबमधील अमृतसर येथे राहणाऱ्या पवन कुमार याच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे तिने भारतात येऊन पवनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, एमिनी आणि पवन यांची साधारण सात महिन्यांपूर्वी फेसबुकवर एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये बातचीत सुरु झाला. नंतर एकमेकांनी आपआपले नंबर शेअर केले. त्यानंतर ते सतक एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. याच मैत्रीतून ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. 

एमिनी ही उत्तर डकोटा विद्यापीठात एका शिक्षक सहाय्यक आहे. ती १५ ऑगस्टला अमृतसरला आली होती. यानंतर एमिनी आणि पवन यांनी हिंदू परंपरेनुसार २५ ऑगस्टला लग्न केलं. एमिनीने हे देखील स्पष्ट केलं की तिने फेसबुकवर सगळ्यात आधी पवनला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. 

लग्नानंतर सध्या एमिनी ही आपल्या पतीसोबत अमृतसरमध्येच आहे. एमिनीला सध्या पंजाबी भाषा बोलता येत नाही. त्यामुळे तिला थोडीशी अडचण येत आहे. तर दुसरीकडे पवनच्या आई-वडिलांना इंग्रजी बोलता येत नाही तसंच त्यांना इंग्रजी समजत देखील नाही. पण तरीही एमिनीसोबत झालेल्या लग्नामुळे पवन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे खूप खुश आहे. 

पवन हा एका खासगी ऑटोमोबाइल कंपनीत काम करतो. या लग्नाबाबत बोलताना पवन म्हणाला की, 'सर्वात आधी आम्ही मेसेंजरवर एकमेकांशी बोलायचो. त्यानंतर आम्ही आमचे मोबाइल एकमेकांना दिले. त्यामुळे आम्ही व्हॉट्सअॅपवर एकमेकांशी बोलू लागलो. त्याच्यानंतर एके दिवशी एमिनीनेच मला लग्नासाठी मागणी घातली आणि मला अमेरिकेला यायची गळ घातली.'

'पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की, मी अमेरिकेला जाऊ शकलो असतो. त्यामुळे मी माझी नेमकी अडचण एमिनीला सांगितली. त्यामुळे एमिनीनेच थेट भारतात येण्याचा निर्णय घेतला. मी कधीही विचार केला नव्हता की, माझं लव्ह मॅरेज होईल.' दुसरीकडे एमिनी देखील या लग्नामुळे खूप खुश आहे. तिला अमृतसरमधील संस्कृती देखील खूपच पसंत पडली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...