सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है - अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांचा शुक्रवार ९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. यावेळी सेलिब्रेशन नंतर काढलेला एक फोटो त्यांनी शनिवारी (१० एप्रिल २०२१) ट्वीट केला.

amruta fadnavis share tweets before and after birthday
सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है - अमृता फडणवीस 

थोडं पण कामाचं

  • सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है - अमृता फडणवीस
  • एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही, अमृता फडणवीस यांचे आधीचे ट्वीट
  • दोन्ही ट्वीट व्हायरल

मुंबईः अमृता फडणवीस यांचा शुक्रवार ९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. यावेळी सेलिब्रेशन नंतर काढलेला एक फोटो त्यांनी शनिवारी (१० एप्रिल २०२१) ट्वीट केला. यात चेहऱ्याला केक लागल्याचे दिसत आहे. हा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट केला. फोटोसोबत अमृता फडणवीस यांनी 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है' अशी फोटो ओळ पण ट्वीट केली. amruta fadnavis share tweets before and after birthday

महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी असलेल्या अमृता या स्वतंत्र विचारांच्या म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवसेना आणि शिवसेनेच्या नेतृत्वातले महाविकास आघाडी सरकार यांच्यावर तिरकस टिप्पणी करण्यासाठी अमृता फडणवीस प्रसिद्ध आहेत. यावेळी स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त करुन अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्वीट केला. या फोटोला कॅप्शन (फोटो ओळ) देण्याच्या निमित्ताने 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है' असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. मात्र ताज्या राजकीय घडामोडींचा विचार करता अमृता फडणवीस यांचे ट्वीट कोणाला उद्देशून असू शकते याचा अंदाज बांधणे कठीण नाही.

वाझे प्रकरणात राज्याच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आणखी एका मंत्र्याने पत्रकार परिषदेत शपथा घेऊन निर्दोष असल्याचा दावा केला. या घटना घडत असतानाच राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड राज्य सरकारने सुरू केली याकडे भाजपने लक्ष वेधले. यानंतरच अमृता फडणवीस यांचे ट्वीट आले आहे. याआधी गुरुवारी ८ एप्रिल २०२१ रोजी अमृता फडणवीस यांनी एक कविता ट्वीट केली होती. 

पहचान कौन?, 

एक राजा जो- 
महल की चौखट से निकलता नही
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही !

सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?

ही कविता अमृता फडणवीस यांनी ट्वीट केली होती. या ट्वीटमध्येही कोणाचा स्पष्ट नामोल्लेख नव्हता. मात्र अमृता फडणवीस यांनी ८ आणि १० एप्रिलच्या ट्वीटमधून नेमका कोणाला टोमणा मारला याचा अंदाज बांधणे शक्य आहे. सध्या ही दोन्ही ट्वीट व्हायरल होत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी