Amul Doodle on Elon Musk | इलॉन मस्कवरील अमूल डूडलने जिंकली मने, मस्कचा ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव, डूडल झाले व्हायरल

Elon Musk proposal to Twitter : दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी सर्व देशभर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अमूलच्या (Amul) जाहिरातीदेखील तितक्याच लोकप्रिय होतात. अमूलचे ताजे व्यंगचित्र टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)आणि ट्विटर धोकादायकपणे विकत घेण्याच्या मस्कच्या प्रस्तावावर विनोद म्हणून करण्यात आले. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी ट्विटरच्या संचालक मंडळाला 43 बिलियन डॉलरचा प्रस्ताव दिला आहे. अमूलचे डूडल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Amul Doodle on Musk gone viral
अमूलचे इलॉन मस्कवरील डूडल झाले व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क हे ट्विटरमधील सर्वात मोठ्या शेअरधारकांपैकी एक आहेत.
  • मस्ककडे ट्विटरमधील ९.२ टक्के हिस्सेदारी आहे
  • सौदी अरेबियाचे प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांचा ट्विटरमध्ये सुमारे ५.२ टक्के हिस्सा आहे.

Amul Doodle on Musk winning hearts : नवी दिल्ली : दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी सर्व देशभर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अमूलच्या (Amul)जाहिरातीदेखील तितक्याच लोकप्रिय होतात. अमूल त्यांच्या कार्टून, स्केचेस आणि डूडलसाठी (Amul Doodle)देखील प्रसिद्ध झाले आहे. यातून ते चालू घडामोडींवर मार्मिक टिप्पणी करत अमूलची जाहिरात करत असतात.  अमूल आपल्या नाविन्यपूर्ण आणि विलक्षण कार्टूनने वाचकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरत आले आहे. अमूलचे ताजे व्यंगचित्र टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)आणि ट्विटर धोकादायकपणे विकत घेण्याच्या मस्कच्या प्रस्तावावर (Elon Musk's proposal to Twitter)विनोद म्हणून करण्यात आले. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी ट्विटरच्या संचालक मंडळाला 43 बिलियन डॉलरचा प्रस्ताव दिला आहे. मस्कच्या ट्विटर विकत घेण्याच्या प्रयत्नांवर जगभर जोरदार चर्चा सुरू आहे. (Amul Doodle on Elon Musk for twitter proposal gets viral on social media)

अधिक वाचा : Viral: अरे बापरे! या फोटोतून होईल तुमच्या बुद्धीची परीक्षा; कुठे लपला आहे फोटोतील ७ वा चेहरा? 

काय आहे अमूलचे मस्कवरील डूडल (Amul Doodle on Musk)

अमूलने एक डूडल शेअर केले आहे. या डूडरमध्ये इलॉन मस्क एका निळ्या पक्ष्याला (हा ट्विटरचा लोगो आहे) पिंजऱ्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र प्रकाशित करतानाच अमूलने त्याला एक जबरदस्त मार्मिक कॅचलाइनदेखील दिली आहे. यात म्हटले आहे की इलॉन फ्लेक्सेस हिज मस्कल्स? इलॉन मस्क त्याचे स्नायू फुलवतो आहे? असे अमूलच्या बॅनरवर म्हटले आहे. स्नायूंना इंग्रजीत मसल्स म्हणतात. मक्सच्या नावाचा वापर करत ते मसल्समध्ये मिसळून एक जबरदस्त टिप्पणी यात करण्यात आली आहे. इलॉन मस्क ट्विटरला विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे त्याची अमूलने खिल्ली उडवली आहे. तिथेच खाली अमूल टेक्स ओव्हर ब्रेड डेली असे म्हणत ट्विटरच्या टेक ओव्हरवर टिप्पणी करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : Viral Video: भररस्त्यात धिंगाणा घालत तरूणीने केली डिलिव्हरी बॉयला मारहाण, व्हिडिओ व्हायरल 

सोशल मीडियावर डूडल झाले व्हायरल

सोशल मीडियावर (social media)अमूलच्या डूडलची जोरदार चर्चा सुरू आहे. "#अमुल टॉपिकल: अब्जाधीशांनी ट्विटरवर कब्जा करण्यासाठी घातकी बोली लावली!"  असे अमूलने सुरूवातीला लिहिले आहे. हे डूडल अमूलने ट्विट केले आहे. अमूलचे हे कल्पक डूडल सोशल मीडियावर व्हायरल (Viral)झाले आहे. अमूलच्या कार्टूनवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहे. अमूलच्या डूडलला काही दिवसांपूर्वी पोस्ट केल्यापासून 169 रिट्विट्स आणि 2,954 लाईक्स मिळाले आहेत.

अधिक वाचा : Viral: 'कच्चा बादाम' नंतर 'बाकी नींबू बाद विच पाऊंगा'ने वेधले लक्ष; पाहा लिंबू सोडा विकण्याचा भन्नाट अंदाज 

जॅक डोर्सींची प्रतिक्रिया

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ असलेल्या इलॉन मस्कने ट्विटरच्या बोर्डावर 43 बिलियन डॉलरमध्ये ट्विटरसारखी लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी विकण्याचा दबाव आणला आहे. त्यामुळेच ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी देखील मौन तोडले आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाला "सातत्याने कंपनीचे बिघडलेले कार्य" असे लेबल लावले आहे.

एका ट्विटर युजरला प्रतिक्रिया देताना, डॉर्सी रविवारी उशिरा म्हणाले: "हे (बोर्ड) सातत्याने कंपनीचे बिघडलेले कार्य आहे". मस्क यांनी म्हटले आहे की ट्विटरच्या बोर्डाने त्यांच्यापेक्षा इतर संभाव्य बोलीदारांबद्दल अधिक जागरुक असले पाहिजे. आपण ट्विटरला 100 टक्के विकत घेण्यासाठीघेतली पाहिजे 43 अब्ज डॉलरची वाजवी ऑफर दिली आहे. 9.2 टक्के समभागांसह, मस्क ट्विटरमधील सर्वात मोठ्या शेअरधारकांपैकी एक आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी