Amul : 'पट मंगनी भट्ट ब्याह' आलिया रणबीरच्या लग्नावर अमूलची जाहिरातीतून लक्षवेधी प्रतिक्रिया

Amul says Patt Mangni Bhatt Byaah, Amul advt on Ranbir kapoor and alia bhatt wedding : अमूल कंपनीने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमधील चर्चित जोडीच्या लग्नावर जाहिरातीमधून लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. अमूलची ही जाहिरात व्हायरल होत आहे.

Amul says Patt Mangni Bhatt Byaah, Amul advt on Ranbir kapoor and alia bhatt wedding
'पट मंगनी भट्ट ब्याह' आलिया रणबीरच्या लग्नावर अमूलची जाहिरातीतून लक्षवेधी प्रतिक्रिया 
थोडं पण कामाचं
  • आलिया रणबीरच्या लग्नावर अमूलची लक्षवेधी जाहिरात
  • 'पट मंगनी भट्ट ब्याह' आलिया रणबीरच्या लग्नावर अमूलची जाहिरातीतून लक्षवेधी प्रतिक्रिया
  • अमूलची ही जाहिरात व्हायरल होत आहे

Amul says Patt Mangni Bhatt Byaah, Amul advt on Ranbir kapoor and alia bhatt wedding : जाहिरातींमधील टॅगलाइन अर्थात लक्षवेधी ओळीसाठी अमूल ही कंपनी भारतातच नाही तर जगभर लोकप्रिय आहे. आपली ही ओळख जपत अमूल कंपनीने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमधील चर्चित जोडीच्या लग्नावर जाहिरातीमधून लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. अमूलची ही जाहिरात व्हायरल होत आहे.

आधी अनेक महिन्यांपासून आलिया आणि रणबीर लग्न करणार अशी चर्चा बॉलिवूडमध्ये होती. पण या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. पण काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरल्याचे जाहीर केले. ही घोषणा झाली आणि काही दिवसांतच आलिया आणि रणबीरचे लग्न झाले. आज गुरुवार १४ एप्रिल २०२२ रोजी आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी पद्धतीने लग्न केले. मुंबईत वांद्रे येथे रणबीरच्या अपार्टमेंटमध्ये निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत लग्न सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी रणबीरकडून त्याची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर आणि तिचे कुटुंब तसेच चुलत बहिणी करिश्मा कपूर आणि करिना कपूर, चुलत भाऊ आदर जैन आणि अरमान जैन तसेच त्यांची आई रिमा जैन उपस्थित होते. आलियाकडून वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहीण पूजा भट्ट आणि शाहीन तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका अंबानी उपस्थित होते. 

आलिया आणि रणबीर लग्न करणार अशा स्वरुपाच्या चर्चेला साधारण पाच वर्षांपूर्वी सुरुवात झाली. हळू हळू ही शक्यता आणखी तीव्र होत गेली. अखेर १४ एप्रिल रोजी लग्न झाले. लग्नानंतर आलिया आणि रणबीरच्या प्रसिद्धी विभागाच्या प्रतिनिधींनी मीडियाच्या प्रतिनिधींना मिठाईचे बॉक्स देऊन आनंद साजरा केला. लग्नानंतर आलिया आणि रणबीर हे दांपत्य थोड्या वेळासाठी मीडियाला पोझ देण्यासाठी आले होते. 

लग्नाची चर्चा दीर्घ काळ झाली आणि ठरल्यानंतर लग्न अगदी झटपट झाले. यामुळे चाहत्यांना सोहळा कसा होणार याविषयी अंदाज व्यक्त करून चर्चा करायला जास्त वेळच मिळाला नाही. मीडिया प्रतिनिधी आणि चाहत्यांच्या मनातील हीच बाब अमूल कंपनीने त्यांच्या जाहिरातीच्या टॅगलाइन अर्थात लक्षवेधी ओळीतून प्रकट केली.

अमूल कंपनीने जाहिरातीत नव दांपत्याच्या शेजारी अमूल गर्ल बटर लावलेले ब्रेड घेऊन उभी असल्याचे दाखवले आहे. पती पत्नीला अमूल बटर लावलेला ब्रेड भरवत आहे असे दाखवले आहे. सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद जाणवत आहे. या चित्राच्यावर अमूलची टॅगलाइन अर्थात लक्षवेधी ओळ आहे. 'पट मंगनी भट्ट ब्याह' असे मोठ्या अक्षरात जाहिरातीच्या चित्रावर नमूद आहे. ही जाहिरात बघताच अमूल कंपनीने आलिया रणबीरच्या लग्नाबाबत अचूक वक्तव्य केल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. ही जाहिरात वेगाने व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी