Power of elephant: चिखलात अडकलेला ट्रक हत्तीने असा काढला बाहेर, या व्हिडिओत दिसेल गजराजाची ताकद

जेव्हा कुठलीही ताकद पुरेशी ठरत नाही, हे समजलं तेव्हा सर्वांनी हत्तीला बोलावण्याचा निर्णय घेतला. हत्ती आला आणि काही मिनिटांतच आपल्या ताकदीने त्याने कमाल केली.

Power of elephant
चिखलात अडकलेला ट्रक हत्तीने असा काढला बाहेर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हत्तीच्या ताकदीची कमाल
  • चिखलात अडकलेला ट्रक सहज काढला बाहेर
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Power of elephant: हत्ती (Elephant) हा एक सर्वशक्तीमान (Powerful) प्राणी म्हणून ओळखला जातो. हत्तीचा मूळ स्वभाव शांत असला तरी जेव्हा जेव्हा त्याला राग येतो, तेव्हा आपलं अक्राळविक्राळ रुप आणि अचाट सामर्थ्य तो दाखवत असतो. त्यामुळे हत्तीपासून सगळे प्राणी चार हात लांब राहणंच पसंत करत असतात. जंगलाचा राजा म्हणवला जाणारा सिंह किंवा इतर प्राण्यांची सहज शिकार करणारे वाघ, बिबटे, चित्ते असे प्राणी हत्तीपासून मात्र सावधच राहत असल्याचं दिसतं. सहसा जंगलातील इतर कुठलाही प्राणी हत्तीची छेड काढायला जात नाही आणि चिडलेल्या हत्तीपासून लांब राहत स्वतःचं संरक्षण करत असल्याचं दिसतं. हाच हत्ती त्याच्या ताकदीचा वापर अनेकदा चांगल्या कामांसाठी करत असल्याचं दिसतं. किंबहूना हत्तीच्या ताकदीचा योग्य वापर कसा करून घेता येईल, ये दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. 

चिखलात रुतला ट्रक

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक ट्रक चिखलात रुतून बसल्याचं दिसतं. हा ट्रक चिखलातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतात. पावसामुळे एका कच्च्या रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. कदाचित पाऊस होण्याआधीपासूनच हा ट्रक इथं थांबला असावा, असं वाटतं.

मात्र तो चिखलात असा काही रुतून बसला आहे की तो बाहेर काढण्यासाठी माणसांची ताकदही पुरेशी ठरत नाही. ट्रक सुरू करून त्याच्या इंजिनाच्या मदतीनेही पुढे जात नाही. अशा वेळी हत्तीला मदतीला बोलावण्याचा निर्णय घेतला जातो आणि गजराज आपल्या ताकदीने अगदी सहज हा ट्रक बाहेर ढकलत असल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Dombivli accident CCTV: डोंबिवलीत भरधाव कारची तिघांना जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

हत्तीने केली कमाल

कुणालाही बाहेर नेता न येणारा हा ट्रक हत्ती आल्यानंतर पुढे सरकायला सुरुवात होते. हत्ती आपल्या ताकदीने हा ट्रक ढकलतो आणि पुढच्या काही मिनिटांतच हा ट्रक चिखलातून पुढे चालायला सुरुवात होते. हत्तीच्या जोडीला काही माणसंदेखील ट्रक ढकलण्यात हातभार लावताना दिसतात. मात्र हत्तीची ताकद किती असते याचा प्रत्यय प्रत्येकाला येतो. हत्तीच्या मानेवर बसलेला माहूत त्याला ट्रक ढकलण्यासाठी प्रवृत्त करतो. ट्रक कुठल्या दिशेला ढकलायचा आहे, हे हत्तीला समजावं यासाठी इतर माणसंही ट्रक पुढे ढकलू लागतात. ते पाहून हत्ती त्यांच्या मदतीला येतो आणि काही मिनिटांतच ट्रक चिखलातून बाहेर काढण्याचं काम यशस्वीरित्या पार पडतं. 

अधिक वाचा - Funny Video: क्लिक अन् लाईक्ससाठी खड्ड्यातील पाण्यात तरुणाचं फोटोशूट, माकड उड्या मारत दिल्या पोझ; निषेध का वेडेपणा तुम्हीच सांगा

व्हिडिओ होतोय व्हायरल

हत्तीच्या कामगिरीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. ट्रक ढकलण्याच्या हत्तीच्या स्टाईलवर आपण फिदा झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी या व्हिडिओखाली दिली आहे. तर हत्तीच्या ताकदीचा आता खरा अंदाज आला, अशी प्रांजळ कबुलीदेखील अनेकांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी