मोटरसायकलवर या पद्धतीने शीडी घेऊन जात होते तरुण, आनंद महिंद्रा म्हणाले - 'इतके खतरनाक सोशल डिस्टंसिंग'

व्हायरल झालं जी
Updated May 01, 2021 | 14:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

शीडी घेऊन जाण्यासाठी दोन्ही तरुणांनी दोन वेगवेगळ्या मोटरसायकल चालवल्या. देशातील आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी हा फोटो पोस्ट करत एक गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Anand Mahindra post
आनंद महिंद्रा यांची ट्विटरवरील पोस्ट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आनंद महिंद्रा यांची पोस्ट
  • मोटरसायकल शीडी नेणारे तरुण
  • सोशल डिस्टंसिंगवरून प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) दोन तरुण शीडी घेऊन  (Two Bikers Transporting A Ladder)जात असतानाचा फोटो वेगाने व्हायरल होतो आहे. हा फोटो पासून तुम्हीदेखील हसून हसून वेडे व्हाल. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी लोक सोशल डिस्टंसिंगचे नवीनवीन मार्ग अवलंबत आहेत. मात्र या तरुणांनी अंमलात आणलेली युक्ती पासून तुम्ही थक्क व्हाल. शीडी घेऊन जाण्यासाठी दोन्ही तरुणांनी दोन वेगवेगळ्या मोटरसायकल चालवल्या. देशातील आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी हा फोटो पोस्ट करत एक गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल फोटो


या फोटोमध्ये दिसते आहे की दोन मोटरसायकलस्वार विचित्र आणि गंमतीशीर पद्धतीने शीडी घेऊन जात आहेत. त्यांनी दोघांनीही आपापल्या गळ्यात शीडी अडकवली होती. हा काही नवीन फोटो नाही. हा फोटो २०१७ पासून इंटरनेटवर व्हायरल (Viral Photo) होतो आहे. आनंद महिंद्रा यांनी या फोटोवर एक गंमतीशीर प्रतिक्रिया देत हा फोटो पोस्ट केला आहे.

आनंद महिंद्रा यांची पोस्ट


आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हा फोटो पाहून या कठीण काळातदेखील चेहऱ्यावर हसू आले. सोशल डिस्टंसिंगचे काही प्रकार सुरक्षेच्या दृष्टीने खूप खतरनाक ठरू शकतात.'
आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासांतच याला एक हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या. या पोस्टच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आनंद महिंद्रा


आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. विविध प्रसंगांवर किंवा परिस्थितीवर ते भाष्य करत असतात. आनंद महिंद्रा हे देशातील आघाडीचा उद्योग समूह, महिंद्रा समूहाचे चेअरमन आहेत. त्यांच्या कारकिर्दीत महिंद्रा समूहाने मोठी झेप घेतली आहे. महिंद्रा लि.ने वाहन उत्पादन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. महिंद्राची अनेक वाहने बाजारपेठेत लोकप्रिय झाली आहेत. आनंद महिंद्रा देशातील विविध परिस्थितीवर नेहमी ट्विट करत असतात. त्याचप्रमाणे कोणतीही नवीन किंवा कौतुकास्पद गोष्ट दिसली की त्यावर ते प्रतिक्रिया देतात. त्यामुळे सोशल मीडिया युजर्समध्ये आनंद महिंद्रा यांचे ट्विटर हॅंडल हे लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. एखाद्या विषयावर आनंद महिंद्रा काय ट्विट करतात यावर नेटीझन्सचे लक्ष असते.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुद्रावतार धारण केला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे देशभर मोठे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, निर्बंध पाळावेत म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. अनेक राज्यात लॉकडाऊनदेखील लावण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर लाखोंचे रोजगार गेले होते. यावर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचा आपले रोजगार गमवावे लागले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी