धाडसी आणि दानशूर मयूर शेळके

मध्य रेल्वेचे वांगणीतील पॉइंटमन मयूर शेळके फक्त धाडसीच नाही तर दानशूरही आहेत. त्यांच्या या स्वभावाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

Anand Mahindra Praised The Bravery Of Mayur Shelke
धाडसी आणि दानशूर मयूर शेळके 

थोडं पण कामाचं

  • धाडसी आणि दानशूर मयूर शेळके
  • मयूूर शेळकेंचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक
  • मयूर शेळके यांना जावा मोटरसायकल बक्षिस म्हणून देणार

कर्जत: मध्य रेल्वेचे वांगणीतील पॉइंटमन मयूर शेळके फक्त धाडसीच नाही तर दानशूरही आहेत. त्यांच्या या स्वभावाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मयूर यांना महिंद्रा थर ही गाडी बक्षिस दिली. जावा मोटरसायकल क्लासिक लीजंडचे प्रमुख आणि कंपनीचे संचालक अनुपम थरेजा यांनी मयूर शेळके यांना जावा मोटरसायकल बक्षिस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. रेल्वेमंत्री पियूष गोयल, महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मयूर शेळके यांचे कौतुक केले. Anand Mahindra Praised The Bravery Of Railway Pointsman Mayur Shelke, Anupam Thareja Announced To Give Jawa Motorcycle

सर्वत्र कोरोना संकटाची चर्चा असताना आणि वातावरण उदास झाले असताना वांगणीत एक थरकाप उडवणारा प्रकार घडला. आपली अंध आई कशी चालते हे समजून घेण्यासाठी आईसोबत जात असलेल्या चिमुरड्याने हळूच डोळे बंद करुन चालायला सुरुवात केली. मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर डोळे बंद करुन चालत असलेल्या मुलाचा तोल जाऊन तो रुळावर पडला. समोरुन वेगाने ट्रेन येत होती. मुलासोबत असलेली महिला अंध होती त्यामुळे तिला मुलाला स्वतःच्या हाताने वर उचलून घेणे कठीण झाले होते आणि मुलाला उंच प्लॅटफॉर्म चढणे जमत नव्हते. अशा कठीण प्रसंगी जीव धोक्यात घालून पॉइंटमन मयूर शेळके यांनी मुलाला वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता मुलाला वाचवणाऱ्या मयूर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

रेल्वे प्रशासनाने मयूर शेळके यांचा गौरव केला. एशियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटने मयूर यांना ५० हजार रुपयांचे बक्षिस दिले. मुलाची आई संगीता शिरसाट यांनीही मयूर यांचे आभार मानले. मयूर यांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून माझ्या मुलाला वाचवले. यासाठी मी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहे असे सांगताना संगीता यांच्या डोळ्यात अश्रू होते. 

मयूर यांनी त्यांना बक्षिसाच्या रुपाने मिळालेल्या रकमेतील ५० टक्के रक्कम ज्या मुलाला वाचवले त्याच्या शिक्षणासाठी संगीता शिरसाट यांच्या ताब्यात दिली. या दानशूरपणातून मयूर शेळके यांनी सर्वांपुढे पुन्हा एकदा आदर्श उभा केला; अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मयूर शेळके यांचे कौतुक केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी