Viral Video : विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की आपण विचारच करू शकत नाही. या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही समोर येत आहेत आहेत. इंटरनेट ही आता चैन नसून गरज झाली आहे. परंतु या इंटरनेटची आपल्यावर 24तास नजर असते. आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर करून तंत्रज्ञान आपल्यात किती डोकावले आहे याची प्रचिती या व्हिडीओद्वारे येत आहे. या व्हिडीओमुळे तंत्रज्ञानाच्या वापरावर किंवा अतिवापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (anand mahindra share viral video how internet is watching you)
अधिक वाचा : Optical illusion : या फोटोंमधले ओळखा 6 फरक; भले भले झाले फेल, सोशल मीडियावर चॅलेंज झाले व्हायरल
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईलवरून पिझ्झा ऑर्डर करत आहे. तेव्हा गुगलने आपण ती पिझ्झाची कंपनी विकत घेतल्याचे सांगितले. ती व्यक्ती पिझ्झा ऑर्डर करत असताना गुगलकडे या व्यक्तीचा सारा इतिहास जमा असतो. या व्यक्तीने कधी पिझ्झा ऑर्डर केला, कुठल्या प्रकारचा केला याची माहिती गुगलकडे सते. बोलता बोलता गुगल त्या व्यक्तीला सांगतो की तुमच्या उत्पन्नाचे स्रोत किती आहे हे सुद्धा मला माहित आहे. एवढी सगळी माहिती गुगलकडे असल्याने तो माणून थक्क होतो आणि कंटाळून फोन ठेवून देतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ खुप आवडला असला तरी अनेक युजर्संनी भिती व्यक्त केली आहे. आपल्या खासगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याची तक्रार काही नेटकर्यांनी केली आहे.
Big brother is (always) watching. The 21st century’s defining emotion will be claustrophobia… pic.twitter.com/lcTf4HItmH — anand mahindra (@anandmahindra) October 18, 2022
एका ट्विटर युजरने म्हटले आहे की गुगलन असा फ्रेमवर्क तयार केला आहे की त्यामुळे प्रत्येकाची पर्सनल स्पेस उरली नाही. यामुळे गुगल पैसे कमवत आहे. डेटा फॉर्मच्य माध्यमातून सर्व माहिती डेटाबेसमध्ये जाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून काम सुरू आहे. एका नेटकर्याने सोशल मीडिया सोडून जगण्याचा विचार करत असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.
अधिक वाचा : Diwali 2022: भारतातील 'या' राज्यात दिवाळी नाही होत साजरी, या गोष्टींसाठी आनंदाच्या सणाला लोकं असतात दुखी
Yes, everything in the form of data goes to database where AI tools use them. — Anurag Kashyap (@AnuragShergarh) October 18, 2022