Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी शेअर केला मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो, कॅप्शनने जिंकले वाचणाऱ्यांचे मन...

Earth photos from Mars : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांच्या ट्विटशिवाय भारतातील ट्विटरचे जग पूर्णच होऊ शकत नाही. आनंद महिंद्रा यांचे ट्विट आणि सोशल मीडियावरील पोस्ट कायम चर्चेत असतात. आनंद महिंद्रांचे ट्विट खूप मनोरंजक आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर (Social Media) कमालीचे अॅक्टिव्ह आहेत. नेटिझन्सचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक आकर्षक पोस्ट वारंवार शेअर करतात. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो शेअर केला आहे.

Earth photos shared by Anand Mahindra
आनंद महिंद्रांचे ताजे ट्विट 
थोडं पण कामाचं
  • आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सतत काहीतरी शेअर करतात
  • आनंद महिंद्रांच्या पोस्टवर नेहमी कॉमेंट्सचा पाऊस पडतो
  • आता त्यांनी मंगळावरून काढलेले पृथ्वीचे फोटो शेअर केले आहेत

Anand Mahindra Latest Tweet : नवी दिल्ली : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांच्या ट्विटशिवाय भारतातील ट्विटरचे जग पूर्णच होऊ शकत नाही. आनंद महिंद्रा यांचे ट्विट आणि सोशल मीडियावरील पोस्ट कायम चर्चेत असतात. आनंद महिंद्रांचे ट्विट खूप मनोरंजक आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर (Social Media) कमालीचे अॅक्टिव्ह आहेत. नेटिझन्सचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक आकर्षक पोस्ट वारंवार शेअर करतात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्ट अनेक व्हायरलदेखील (Viral) होत असतात. कधी ते जुगाडच्या नावाने लोकांना गुदगुल्या करतात, कधी जीवनाचे मर्म समजावून सांगतात. महत्त्वाचे म्हणजे हे ट्विट अनेक युजर्सना प्रेरणा देतात. आनंद महिंद्रा यांचे नवे ट्विट (Anand Mahindra tweet) देखील सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेते आहे. 21 जुलै रोजी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक छायाचित्र रिट्विट केले, ज्यात त्यांनी असे कॅप्शन लिहिले की ते वाचून लोक त्यांचे चाहते झाले! आनंद महिंद्रा यांचे हे नवे ट्विट काय आहे आणि त्यात त्यांनी काय शेअर केले आहे ते पाहूया. (Anand Mahindra Shares photographs of Earth taken from Mars, caption attracts people)

अधिक वाचा - Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून

आनंद महिंद्रांनी शेअर केला मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो शेअर केला आहे. तो युजर्सचे लक्ष वेधून घेतो आहे. हा फोटो पृथ्वीचा आहे जो मंगळावरून घेण्यात आला आहे. म्हणजे मंगळावरून पृथ्वीकडे पाहिल्यास ते असे दिसेल. मी तुम्हाला सांगतो, मूळ छायाचित्र क्युरिऑसिटी नावाच्या ट्विटर पेजने शेअर केले होते, ज्याने सांगितले आहे की, हा फोटो मंगळावरून घेण्यात आला आहे, दिसणारा छोटा तारा (पांढरा रंगाचा ठिपका) दिसतोय ना… ती आपली पृथ्वी आहे. याला रिट्विट करत महिंद्राने एक अप्रतिम कॅप्शन लिहिले, जे वाचून लोक त्यांची प्रशंसा करत आहेत.

अधिक वाचा - Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी शेअर केला कपडे सुकवण्याच्या नव्या तंत्रज्ञानाचा फोटो, इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस

आपल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात, हा फोटो मंगळ ग्रहावरून काढलेला आहे. फोटोमध्ये आपल्याला मंगळ ग्रह आणि पांढऱ्या ठिपक्याप्रमाणे दिसणारा तारा दिसतो आहे. तो ठिपका म्हणजे आपली प्रिय पृथ्वी आहे. पुढे आणखी एक ट्विट करत आनंद महिंद्रा म्हणतात की हा फोटो आपल्याला एकच गोष्ट शिकवतो ती म्हणजे माणुसकी.

अधिक वाचा - Optical Illusion: या फोटोत तुम्हाला हत्ती दिसला का? ९९ टक्के लोक झाले फेल

आनंद महिंद्रांनी फोटोला दिलेले कॅप्शन

हा फोटो आनंद महिंद्रा यांनी 21 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – या चित्रातून आपण फक्त एकच गोष्ट शिकली पाहिजे… ती म्हणजे माणुसकी. त्यांच्या या ट्विटला आतापर्यत पाच हजारांहून अधिक लाईक्स आणि सहाशे रिट्विट्स मिळाले होते. तसेच, युजर्स सतत यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्स आनंद महिंद्रा यांच्याशी सहमत आहेत, तर काहींनी हा एलियन व्ह्यू असल्याचे लिहिले आहे. बरं, या फोटोबद्दल तुमचं काय मत आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडिया युजर्सना सतत काहीना काही खाद्य देतात हे मात्र निश्चित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी