Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी शेअर केला कपडे सुकवण्याच्या नव्या तंत्रज्ञानाचा फोटो, इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस

Anand Mahindra Post : उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) हे सोशल मीडियावर (Social Media) कमालीचे अॅक्टिव्ह आहेत. नेटिझन्सचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक आकर्षक पोस्ट वारंवार शेअर करतात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्ट अनेक व्हायरलदेखील (Viral) होत असतात. आनंद महिंद्रा यांची नवी पोस्ट (Anand Mahindra Post) देखील सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेते आहे.

Anand Mahindra post
आनंद महिंद्रा यांची नवी पोस्ट 
थोडं पण कामाचं
  • उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह
  • आनंद महिंद्रा यांच्या पोस्ट अनेक व्हायरलदेखील (Viral) होतात
  • आनंद महिंद्रा यांनी कपडे सुकविण्यासाठी वापरले जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानासंदर्भात नवी पोस्ट केली आहे

Anand Mahindra Latest Post : नवी दिल्ली : उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) हे सोशल मीडियावर (Social Media) कमालीचे अॅक्टिव्ह आहेत. नेटिझन्सचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक आकर्षक पोस्ट वारंवार शेअर करतात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्ट अनेक व्हायरलदेखील (Viral) होत असतात. आनंद महिंद्रा यांची नवी पोस्ट (Anand Mahindra Post) देखील सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी कपडे सुकविण्यासाठी वापरले जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानासंदर्भात माहिती देत फोटो दिला आहे. (Anand Mahindra's new post sharing photo of Latest Technology" To dry Clothes attracts attention on social media)  

अधिक वाचा - Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून

महिंद्रानी शेअर केली नवी पोस्ट

महिंद्रा अॅंड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी ट्विटरवर व्यंगचित्रासह एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये दोन महिला पारंपरिक पद्धतीने दोरीवर कपडे वाळवताना दिसत आहेत, यात म्हटले आहे की, हे अत्याधुनिक तंत्रज्ञानान धुतलेले कपडे सुकवते. सौर आणि पवन उर्जेचा वापर करून यात कपडे सुकवले जातात. आनंद महिंद्रा यांनी नवी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, "कधीकधी, 'नवीन' तंत्रज्ञान फक्त मूलभूत गोष्टींवर परत जाण्यासाठी असते."

या मिश्किल पोस्टला 9,000 हून अधिक लाईक्स आणि शेकडो शेअर्स जमा झाले आहेत. सोशल मीडियावरी अनेक युजर्स त्यांच्याशी संबंधित पोस्ट शोधताना पाहिले जाऊ शकतात.

"सर, तथाकथित तंत्रज्ञानामुळे आम्हाला आमचे स्वतःचे पारंपारिक मार्ग विसरायला लावले. जे कपडे सुकवण्याचा साधा आणि खरा स्वच्छ मार्ग आहे," असे एका सोशल मीडिया युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले.

अधिक वाचा - Miracle : पिल्लू खड्ड्यात पडल्यामुळे हत्तीण झाली बेशुद्ध, मग घडला चमत्कार, पाहा VIDEO

"सर्व तंत्रज्ञान मूलभूत गोष्टींद्वारे नियंत्रित केले जातात, जे कधीही अपयशी ठरत नाहीत, हे निसर्गाचे नियम आहेत," असे दुसऱ्या एक सोशल मीडिया युजरने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

ब्रिटनमधील राजकीय परिस्थितीवरील ट्विट

दुसर्‍या पोस्टमध्ये, त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 10 डाउनिंग स्ट्रीटवर एक मेम शेअर करून युनायटेड किंगडममध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाकडे लक्ष वेधले. स्नॅपशॉटमध्ये निवासस्थानाच्या बाह्य भागाचे चित्रण करण्यात आले आहे, जे कोरड्या आंब्याच्या पानांनी आणि स्वस्तिक चिन्हाने (उत्सवाचे चिन्ह म्हणून) सुशोभित केलेले आहे.

अधिक वाचा - Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून

त्यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे की "10 डाउनिंग स्ट्रीटचे भविष्य? प्रसिद्ध ब्रिटिश विनोद आता देशी विनोदाने सजला आहे."

हा फोटो मंगळवारी शेअर करण्यात आला आणि त्याला ट्विटरवर 12,000 हून अधिक लाईक्स मिळाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी