आई-वडील रागावल्याने मुलाने चिडून स्वत:साठी बनवले अंडरग्राऊंड घर

व्हायरल झालं जी
Updated May 31, 2021 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

१४वर्षाचे वय असताना या मुलाने आपल्या घराच्या गार्डनमध्ये खोदकाम सुरू केले. आता सहा वर्षानंतर या मुलाच्या मेहनतीला रंग आले आहे.

cave
आई-वडील रागावल्याने मुलाने स्वत:साठी बनवले अंडरग्राऊंड घर 

थोडं पण कामाचं

  • सहा वर्षानंतर आता २० वर्षांचा झालेल्या कँटोकडे आता एक अंडरग्राऊंड घर आहे.
  • यात खाली पायऱ्या उतरून गेल्यावर त्याची लिव्हिंग रूम आणि बेडरूम आहे. 
  • कँटाचे हे अंडरग्राऊंड घर उन्हाळ्यात आराम करण्यासाठी शानदार ठिकाण बनले आहे.

मुंबई: आई-वडिलांच्या रागावण्याने लहानश्या वयात या मुलावर असा काही परिणाम झाला की त्याच्या डोक्यात भलतेच आले. १४वर्षाचे वय असताना या मुलाने आपल्या घराच्या गार्डनमध्ये खोदकाम सुरू केले. आता सहा वर्षानंतर या मुलाच्या मेहनतीला रंग आले आहे. त्याची ही प्रतिभा पाहून तुम्हालाही धक्का बसेल. (andres canto made underground houe after quarrel with parents)

ही कहाणी आहे स्पेनच्या आंद्रेस कँटोची. तो जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याला ट्रॅकसूट घालून जवळ्या गावात जाण्यास नकार होता. यावरून त्याचे आपल्या आई-वडिलांशी भांडण झाले. यामुळे चिडलेल्या कँटोने आपल्या आजोबांच्या कुदळीने घरातील बागेत खोदण्यास सुरूवात केला. रागाने सुरू केलेल्या या गोष्टींचे रूपांतर एका सुंदर गोष्टीत घडले आहे. सहा वर्षानंतर आता २० वर्षांचा झालेल्या कँटोकडे आता एक अंडरग्राऊंड घर आहे. यात खाली पायऱ्या उतरून गेल्यावर त्याची लिव्हिंग रूम आणि बेडरूम आहे. 

कँटाचे हे अंडरग्राऊंड घर उन्हाळ्यात आराम करण्यासाठी शानदार ठिकाण बनले आहे. त्याच्या मते सगळ्यात उन्हाळ्याच्या महिन्यांमध्येही येथील तापमा २०-२१ डिग्रीपेक्षा अधिक नसते. मात्र पावसात त्याला पाणी भरणे आणि किड्यांचा सामना करावा लागतो. 

आंद्रेसच्या मते त्याच्या आई-वडिलांना या घराबाबत काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र स्थानिक ऑथॉरिटी तपासासाठी येथे आले होते जे बेसमेंट सांगून या कायदेशीर स्ट्रक्चरवर मोहर लावून गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी