धक्कादायक, संतापलेल्या ग्राहकाने मॅनेजरच्या तोंडावर फेकले गरम सूप, व्हिडिओ व्हायरल 

या महिलेवर नेटिझन्सने टीकेची झोड उठवली आहे. आणि कदाचित तिच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. 

angry restaurant customer throws steaming soup in managers face shocking video goes viral
संतापलेल्या ग्राहकाने मॅनेजरच्या तोंडावर फेकले गरम सूप 
थोडं पण कामाचं
  • या घटनेचे फुटेज, जे आता TikTok वर व्हायरल झाले आहे, त्यात ती महिला वितळलेल्या प्लास्टिकच्या तुकड्याकडे निर्देश करण्यासाठी कंटेनरचे प्लास्टिकचे झाकण काढत असताना व्यवस्थापकाशी वाद घालताना दिसते.
  • आरोपी महिला मग अचानक, मॅनजर ब्रोलँडच्या चेहऱ्यावर कंटेनर फेकते आणि ताबडतोब स्टोअरच्या बाहेर पळून जाते
  • या संपूर्ण प्रकरणामुळे महिला व्यवस्थापक अत्यंत घाबरली आणि काही काळ धक्क्यात होती. सुदैवाने, तिला कोणतीही जखम झाली नाही

customer throws steaming soup । टेक्सास : एका रेस्टॉरंट मॅनेजरच्या चेहऱ्यावर वाफाळलेला सूप फेकतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरला झाला, आता त्यामुळे मॅनेजरच्या चेहऱ्यावर सूप फेकणाऱ्या एका महिलेवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. 

मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सासच्या टेम्पल येथील मेक्सिकन चेन रेस्टोरंट सोल डी जॅलिस्को येथे मसालेदार सूपच्या पार्सल कंटेनरमध्ये वितळलेल्या प्लास्टिकचा तुकडा सापडल्यानंतर व्हिडिओमधील अनाहूत महिला ग्राहक संतप्त झाली.

परिणामी, तिने ताबडतोब मॅनेजर, जॅनेल ब्रोलँड जवळ गेली  आणि सूपने कंटेनरचे झाकण विरघळल्याचा दावा केल्यावर मसालेदार  मेक्सिकन मेनूडो सूप तिच्या चेहऱ्यावर फेकले.

या घटनेचे फुटेज, जे आता TikTok वर व्हायरल झाले आहे, त्यात ती महिला वितळलेल्या प्लास्टिकच्या तुकड्याकडे निर्देश करण्यासाठी कंटेनरचे प्लास्टिकचे झाकण काढत असताना तिचा व्यवस्थापकाशी वाद घालताना दिसते आहे. मग अचानक, ती ब्रोलँडच्या चेहऱ्यावर कंटेनर फेकते आणि ताबडतोब स्टोअरच्या बाहेर पळून जाते.

व्हिडिओ पहा:

चेतावणी: काही दर्शकांना हे फुटेज त्रासदायक वाटू शकते

ब्रोलँडला संपूर्ण प्रकरणामुळे खूप धक्का बसला आणि त्याचे मन दुखले होते. सुदैवाने, तिला कोणतीही जखम झाली नाही.

"हा अनुभव स्वतःच अत्यंत क्लेशकारक आणि हृदयद्रावक होता. मला असे वाटले की कोणीतरी इतके भयानक काहीतरी करू शकते आणि मी हसू की रडू हे मला काही कळत नाही, यामुळे मला खूप त्रास झाला," ब्रोलँडने मेल ऑनलाइनशी बोलताना सांगितले. 

आरोपी महिलेवर नेटिझन्सने टीकेची झोड उठवली आहे आणि कदाचित तिच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते.

ब्रोलँड यांनी या घटनेची माहिती टेम्पल पोलिसांना दिली आहे. तिच्याकडे महिलेच्या कारचे फोटो देखील आहेत जे इतर ग्राहकांनी काढले होते. महिलेवर संपूर्ण आरोप लावण्याचा तिचा मानस आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी