Anushka Sharma's Insta Post : कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, अनुष्काची भावनिक पोस्ट

Anushka Sharma emotional post for Virat Kohli : विराट कोहलीने भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा कोहलीने विराटसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली. 

Anushka Sharma emotional post for Virat Kohli
कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, अनुष्काची भावनिक पोस्ट 
थोडं पण कामाचं
  • कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले
  • अनुष्काची भावनिक पोस्ट
  • इन्स्टाग्रामवर केली पोस्ट

Anushka Sharma emotional post for Virat Kohli : मुंबई : विराट कोहलीने भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा कोहलीने विराटसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली. 

अनुष्का शर्माच्या मूळ इंग्रजी इन्स्टाग्राम पोस्टचा मराठी स्वैर अनुवाद

मला २०१४ चा तो दिवस आजही आठवतोय जेव्हा आपल्याला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले कारण कर्णधार धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मला आठवतंय त्या दिवशी धोनी, आपण आणि मी गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मस्करीत आपल्या दाढीचा रंग लवकर बदलेले अशी चर्चा सुरू झाली आणि आपण सगळेच हसत होतो. त्या दिवसापासून मी आपल्या दाढीच्या बदलत्या रंगापासून अनेक बदल बघत आहे. मी आपल्याला प्रगती करताना आणि पुढे वाटचाल करताना बघत आहे. आपल्या नेतृत्वात नवे विक्रम आणि ऐतिहासिक अशी कामगिरी घडल्याचे अनेक प्रसंग आले. आपल्या नेतृत्वात संघाने ही कामगिरी केली याचा मला अभिमान वाटतो. पण ही कामगिरी करताना आपण स्वतःमध्ये जे बदल घडवून आणले त्यांचा मला जास्त अभिमान वाटतो. 

२०१४ मध्ये आपण इतके लहान होतो. फक्त चांगले विचार, चांगल्या इच्छा, सकारात्मक प्रयत्न यांच्या जोरावर प्रगती केली. हे करताना आलेल्या आव्हानांचा सामना केला. फक्त मैदानावरच नाही तर आयुष्यातही आव्हानांना सामोरे गेलो. हेच तर खरे आयुष्य आहे. आव्हानं आपली परीक्षा घेतात. ज्याची आपण कमीत कमी अपेक्षा केली असते पण ज्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठीच आपली सर्वाधिक आवश्यकता असते अशा स्थितीतून आपण तावून सुलाखून निघता. मला अभिमान वाटतो अशा सर्व परिस्थितीत आपण फक्त चांगल्या इच्छा आणि विचारांनीच कार्यरत राहिलात. आपण सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने खेळून विजय मिळवला. काही वेळा पराजय झाला त्यावेळी आपल्या डोळ्यातले अश्रू मी बघितले आहेत. जेव्हा आपल्यासोबत असायचे तेव्हा मनात एकच विचार असायचा की अजूनही काही आहे का जे आपण करू शकाल. आपण हे असे आहात आणि म्हणूनच आपल्याकडून अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत. 

आपण अतिशय साधे आहात. देखावा करणे आपल्याला पसंत नाही. आपली हीच गोष्ट मला आणि आपल्या अनेक चाहत्यांना आवडते. या वर्तनामागचा हेतू अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. प्रत्येकाला तो समजत नाही. पण ज्यांनी आपल्याला समजून घेतले त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपल्यातही काही दोष आहेत. पण ते लपवण्यापेक्षा आपण प्रामाणिकपणे ते स्वीकारुन दूर करण्याचा प्रयत्न करता. आपण फक्त काही तरी चांगले करण्यासाठी संघर्ष केला. चुकीच्या मार्गांपासून दूर राहिलात. एवढी मोठी जबाबदारी सांभाळताना पण ही काळजी घेतली. अधिकाधिक यशासाठी अधिकाधिक कष्ट केले पण चुकीच्या मार्गांना जवळ केले नाही. सात वर्षात अनेक अनुभव घेतले. यातून जे शिकलात ते आपल्या मुलीलाही मोठा धडा देऊन जाणारे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी