VIRAL VIDEO:दात नका काढू, डेंटिस्टला या चिमुकल्याने दिले असे कारण की तुम्हीही व्हाल हैराण

व्हायरल झालं जी
Updated Mar 31, 2021 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anushrut viral video:अनुश्रुत नावाच्या मुलाचा केस कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला तुमच्या लक्षात असेल. त्याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो डेंटिस्टकडे गेला आहे. 

anushrut
VIRAL VIDEO: दात नका काढू, डेंटिस्टला या चिमुकल्याचा सल्ला 

थोडं पण कामाचं

  • अनुश्रुतच्या मनमोहक नखऱ्यांनी नेटिझन्सची मने जिंकली
  • हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 
  • येथे अनुश्रुत एका सीटवर बसला आहे. डेंटिस्ट त्याच्याशी बोलत आहे. तसेच तोही डेंटिस्टला प्रश्न विचारतो

मुंबई: बाल मत काटना...अशी गोंडस विनवणी कऱणाऱ्या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ तुमच्या लक्षात असेल ना? काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात तो छोटा मुलगा हेअर कट करताना आपल्या गोष्टींनी साऱ्यांची मने जिंकून घेतो. या मुलाचे नाव अनुश्रुत  (Anushrut)आहे. त्याचाच एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात तो डेंटिस्टकडे बसला आहे आणि आपल्या गोष्टींनी त्याने समोरच्या लोकांचे ध्यान पुन्हा आकर्षित करू घेतले आहे. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अनुश्रुतच्या मनमोहक नखऱ्यांनी नेटिझन्सची मने जिंकली आहेत. या वेळेस तो डेंटिस्टशी क्यूटपणे वाद घालताना दिसत आहे. तसेच आपले तर्क वितर्क लढवताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या वडिलांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. येथे अनुश्रुत एका सीटवर बसला आहे. डेंटिस्ट त्याच्याशी बोलत आहे. तसेच तोही डेंटिस्टला प्रश्न विचारतो, की तुम्ही काय करत आहात?

गेल्या वर्षी अनुश्रुतचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. यात तो केस कापताना दिसत होता. मात्र त्याला केस कापायचे नसतात. केस कापत असताना केस कापणाऱ्या व्यक्तीलाही हा अनुश्रूत धमकी देताना दिसतो. या व्हिडीओला लोकांनी मोठी पसंती दिली होती. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी