Appleचा सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या मुलगी  मॉडेलिंगमध्ये, पाहा तिचे हे PHOTO

अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स याच्या मुलीने वयाच्या 22व्या वर्षी मॉडेलिंग कारकीर्दीला सुरुवात केली आहे. तिने तिचे काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत.

steve jobs daughter eve jobs
स्टीव्ह जॉब्सच्या मुलगी  मॉडेलिंगमध्ये, पाहा तिचे हे PHOTO  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • 22-वर्षीय इव जॉब्सने तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली
  • स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने ग्लॉसियर प्लेफुल हॉलिडे ब्युटी कॅम्पेनमधून केलं मॉडेलिंगमध्ये पदार्पण
  • इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो 

कॅलिफोर्निया: स्टीव्ह जॉब्स (steve jobs)  याला कोण ओळखत नाही, मोबाइल विश्वातील राजा म्हणून ओळखला जाणारा अॅपलचा  (apple) सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स हा जगातील नामांकित व्यक्तींपैकी एक आहे. पण यावेळेस बातमी  स्टीव्ह जॉब्सविषयी नाही तर त्याच्या मुलीविषयी आहे. खरं तर त्याची २२ वर्षांची मुलगी इव (Eve Jobs) हिने ग्लॅमरच्या जगात प्रवेश केला आहे. इवने मॉडेलिंग विश्वात आपलं नाव कमविण्याचा विचार केला आहे. तिने ग्लॉसियर प्लेफुल हॉलिडे ब्युटी कॅम्पेनद्वारे मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले आहे. 

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह 

इवने तिचे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जिथे तिचे सुमारे दीड लाख फॉलोअर्स आहेत. या फोटोंमध्ये इव्ह खूपच सुंदर दिसत आहे. इवने या ब्यूटी कॅम्पेनेसाठी बाथ टबमध्ये पोझ दिली आहे. ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये इव सुंदर सोन्याच्या दागिन्यांसह दिसत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की इव लवकरच सोशल मीडिया इंफ्लूएंसर बनेल.

2021 मध्ये होणार ग्रॅज्युएट 

इव स्टॅन फोर्ड विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण घेत आहे. ती पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये पदवीधर होईल. या विद्यापीठाची खास बाब म्हणजे तिच्या आई-वडिलांची पहिली भेट याच विद्यापीठात झाली होती.

तीन भावंडांमध्ये इव सर्वात लहान

स्टीव्ह जॉब्स आणि त्यांची पत्नी पॉवेल जॉब्स यांना तीन मुले आहेत. रीड जो २९ वर्षाचा आहे. त्यानंतर एरिन जो २५ वर्षांचा आहे आणि त्यानंतर सर्वात लहान इव जी २२ वर्षांची आहे. स्टीव्ह जॉब्सची आणखी एक मुलगी आहे. जी त्याच्या दुसऱ्या रिलेशनशीपमधील आहे. त्याच्या या मुलीचं नाव लिसा जॉब्स असून ती ४२ वर्षांची आहे.

स्टीव्ह जॉब्सची मालमत्ता केली जाणार दान

२०११ साली स्टीव्हचा मृत्यू झाला झाला तेव्हा त्यांची जवळपास १० अब्ज डॉलर्सची एवढी संपत्ती होती. दरम्यान, ही संपत्ती पॉवेल आणि लिसा जॉब्स यांच्यात वाटली गेली. ज्यामध्ये पॉवेलला संपत्तीचा अधिक भाग मिळाला.

तथापि, पॉवेल म्हणते की. मी ही संपूर्ण मालमत्ता चांगल्या कामासाठी लावणार आहे. ही सर्व मालमत्ता दान केली जाईल. माझ्या मुलांना यातून काहीही मिळणार नाही आणि ही गोष्ट त्यांना देखील माहित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी