Viral Video : शंभर वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने उभं राहून केला सॅल्यूट

Army felicitates ex-drill instructor Major Swamy on his 100th birthday, Anand Mahindra shares heartwarming video : राष्ट्रीय रक्षा अकादमीचे माजी ड्रिल प्रशिक्षक सब मेजर स्वामी यांचा शंभराव्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला.

Army felicitates ex-drill instructor Major Swamy on his 100th birthday, Anand Mahindra shares heartwarming video
शंभर वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने उभं राहून केला सॅल्यूट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शंभर वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने उभं राहून केला सॅल्यूट
  • शंभरीच्या स्वामी यांनी उपस्थितांना कडक सॅल्यूट केला
  • हा सॅल्यूट करतानाचा व्हिडीओ अनेकांना प्रेरणा देणारा, उत्साह वाढविणारा

Army felicitates ex-drill instructor Major Swamy on his 100th birthday, Anand Mahindra shares heartwarming video : राष्ट्रीय रक्षा अकादमीचे माजी ड्रिल प्रशिक्षक सब मेजर स्वामी यांचा शंभराव्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी थोड्या वेळासाठी व्हीलचेअरमधून उठून उभे राहून माजी ड्रिल प्रशिक्षक सब मेजर स्वामी यांनी उपस्थितांना कडक सॅल्यूट केला. माजी लष्करी अधिकाऱ्याचा हा सॅल्यूट करतानाचा व्हिडीओ अनेकांना प्रेरणा देणारा, उत्साह वाढविणारा असा आहे. हा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असलेला व्हिडीओ महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी #MondayMotivation हा हॅशटॅग वापरून ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ हजारो ट्विटर युझरनी बघितला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला. व्हिडीओ ट्विटरवरून वेगाने व्हायरल होत आहे.

इराणमधून चीनला जात असलेल्या विमानाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुखोई आकाशात

शंभरीचा माणूस उभं राहून सॅल्यूट करतो तेव्हा शिस्त, सराव, फिटनेस यांचा तो सर्वोत्तम आदर्श आहे, असेच म्हणावे लागेल. इतरांसाठी आदर्श ठरावा असा हा व्हिडीओ तीन हजारपेक्षा जास्त वेळा रिट्वीट झाला आहे. व्हिडीओला ट्विटरवर 25 हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. हा व्हिडीओ बघताना देशभक्त सैनिक कसा असतो हे लक्षात येते आणि नकळत देशभक्तीची प्रेरणा मिळते. 

Flight got hit by bullet: अजब आणि अतर्क्य! जमिनीवरून डागलेली गोळी 3500 फूटांवरील विमानात घुसली आणि…

भारतीय सैन्यासाठी महत्त्वाचा दिवस

आज भारताच्या हवाई दलामध्ये हलक्या वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला. या लाइट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टरमुळे भारताची लढण्याची क्षमता आणखी वाढली. हे हेलिकॉप्टर टप्प्याटप्प्याने भारताच्या जुन्या रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टरची जागा घेणार आहे. क्षेपणास्त्र हल्ला आणि गोळीबार करण्यास सक्षम असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे भारताला दहशतवादी, नक्षलवादी आणि शत्रू सैन्य या सर्वांविरोधात प्रभावी आणि वेगवान कारवाई करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. हेलिकॉप्टरमुळे शत्रूला बेसावध गाठणे तसेच शत्रूपासून सुरक्षित अंतर राखून भेदक हल्ले करणे भारताला शक्य होणार आहे. एकीकडे सैन्याच्या बळात वाढ होत असताना दुसरीकडे भारतीय सैन्याशी संबंधित असलेल्या शंभरीच्या जवानाचा फिटनेस पण उत्तम असल्याचे व्हायरल व्हिडीओतून दिसले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी